Tarun Bharat

ग्राहकांना वारंवार विनंती करीत राहणार

खासगीत्व धोरणासंबंधी व्हॉट्सऍपचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जे युजर्स (ग्राहक) नव्या खासगीत्व धोरणाचा स्वीकार करणार नाहीत, त्यांची सेवा मर्यादित केली जाणार नसली तरी त्यांना नवे धोरण स्वीकारण्यासंबंधी वारंवार विचारणा केली जाईल, असे व्हॉटस्ऍप या लोकप्रिय कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच लोकांच्या संदेश पाठविण्याच्या प्रक्रियेवरही (मेसेजिंग प्रोसेस) याचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही सांगण्यात आले.

व्हॉट्सऍप आपल्या ग्राहकांना नवी खासगीत्व धोरण (प्रायव्हसी पॉलिसी) स्वीकारण्यास भाग पाडीत आहे असा आरोप केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात केला होता. केंद्र सरकारने या धोरणाविरोधात विधेयक मांडले असून ते संमत होईपर्यंत व्हॉट्सऍपकडून ग्राहकांवर दबाव आणण्याचे काम सुरू आहे, असे केंद्राचे म्हणणे होते. त्यावर या कंपनीने हे स्पष्टीकरण दिले आहे.

धोरण काय आहे ?

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सऍपने आपल्या ग्राहकांच्या खासगी माहिती संबंधीच्या धोरणात परिवर्तन केले आहे. त्यानुसार या ग्राहकांची खासगी माहिती इतर कंपन्यांना ग्राहकाच्या अनुमतीशिवाय दिली जाणार आहे. या धोरणाला ग्राहकांनी विनाअट संमती द्यावी असे या फेसबुकच्या मालकीच्या कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे व्हॉट्सऍपची सेवा हवी असेल तर कंपनीच्या नव्या खासगीत्व धोरणाला ग्राहकाने मान्यता देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्र सरकारचा कायदा

केंद्र सरकारने या धोरणाविरोधात कायदा करण्यासाठी पावले उचलली असून या प्रस्तावित कायद्याचे नाव ‘व्यक्तिगत माहिती सुरक्षा कायदा’ असे ठेवण्यात आले आहे. हा कायदा संमत झाल्यास व्हॉट्सऍपला किंवा त्यासम कंपन्यांना त्यांच्या मनानुसार ग्राहकांच्या माहितीचा उपयोग करता येणार नाही.

53 कोटी युजर्स

भारतात व्हॉट्सऍपचे 53 कोटीहून अधिक ग्राहक (युजर्स) आहेत. आपल्या खासगी आणि व्यक्तीगत माहितीचा उपयोग व्हॉट्सऍपकडून गैरमार्गाने केला जाईल, अशी शंका त्यांना आहे. काही जणांनी कंपनीच्या नव्या खासगीत्व धोरणासमोर मान तुकवली आहे. तथापि, बहुसंख्य ग्राहकांचा विरोध आहे. केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसारच व्हॉट्सऍपला वागावे लागेल, असे केंद्र सरकारने बजावले आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

उच्चशिक्षित महिला यशस्वी शेतकरी

Amit Kulkarni

शाहूवाडीतील वारकऱ्यांच्या गाडीला मिरजेत अपघात, १३ जण जखमी

Abhijeet Khandekar

पत्रकार परिषदेत का रडले चंद्राबाबू नायडू, नेमकं कारण काय?

Archana Banage

आणखी एक अभिनेत्री कारागृहात

Patil_p

मोठी बातमी : दहावीची परीक्षा रद्द, तर बारावी परीक्षा होणार

Archana Banage

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांपार

datta jadhav