Tarun Bharat

ग्रा. पं.कर्मचाऱयांचे जिल्हा पंचायतसमोर ठिय्या

विविध मागण्यांसाठी कर्मचाऱयांनी थोपटले दंड

प्रतिनिधी /बेळगाव

गेल्या अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतमध्ये आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहोत. काही जणांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले आहे. मात्र त्यांना अद्याप नियमानुसार बढती देण्यात आली नाही. यासह इतर मागण्यांसाठी जिल्हय़ातील ग्राम पंचायत कर्मचाऱयांनी जिल्हा पंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्हा पंचायतच्या अधिकाऱयांना निवेदन सादर केले.

कायद्यानुसार बढती देणे गरजेचे आहे. याचबरोबर अजूनही काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीनेच काम करत आहेत. त्यांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेतले पाहिजे, यासह इतर मागण्या कर्मचाऱयांनी केल्या आहेत. आंदोलनामध्ये बहुसंख्य ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱयांनी भाग घेतला होता. यावेळी व्ही. पी. कुलकर्णी, जे. एम. जैनेखान यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

ग्रामीण मतदारसंघात म. ए. समितीचा भगवा फडकणार

Amit Kulkarni

चांगभलच्या गजरात चंद्रव्वाताई देवीचा रथोत्सव साजरा

Omkar B

रेड्डी भवनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

Patil_p

आगीत गवतगंजीसह साहित्य खाक, लाखाचे नुकसान

Amit Kulkarni

शुक्रवारी 52 वाहने जप्त

Amit Kulkarni

उचगाव येथील स्पर्धेत कौलगे कबड्डी संघ विजेता

Amit Kulkarni
error: Content is protected !!