Tarun Bharat

ग्रीकच्या सिटसिपेसचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ मार्सेली

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरूषांच्या खुल्या मार्सेली टेनिस स्पर्धेत ग्रीकच्या सीडेड सिटसिपेसचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात रोमन सेफुलीनने सिटसिपेसचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.

रशियाच्या सैफुलीनने सिटसिपेसचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात रशियाच्या रूबलेव्हने फ्रान्सच्या रिचर्ड गॅसकेटचा 6-3, 1-6, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. हा सामना 100 मिनिटे चालला होता. दुसऱया एका सामन्या फ्रान्सच्या बेंजामिन बोंजीने कॅरेटसेव्हवर 6-1, 6-3 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे.

Related Stories

भारताची जपानवर एकतर्फी मात

Patil_p

मिझोरामचे क्रिकेट प्रशिक्षक लोधगर कालवश

Patil_p

स्वायटेक, गॉफ, सिनर, फेलिक्स स्पर्धेबाहेर

Patil_p

जर्मनीच्या व्हेरेव्हचे आव्हान संपुष्टात

Patil_p

रेड बुलचा व्हर्स्टापेन विजेता

Patil_p

जमैका थलैवाजची विजयी सलामी

Patil_p