Tarun Bharat

ग्रीन झोनमध्ये दारूची दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ग्रीन झोन मध्ये दारूची दुकाने खुली ठेवण्यास केंद्राने सशर्त परवानगी दिली आहे. सोमवार पासून दुकाने उघडण्यात येतील मात्र, यासाठी ग्राहकांनी दारूच्या दुकानाबाहेर सहा फूट अंतर ठेवून रांग लावणे आवश्यक आहे. अशी अट देखील घालण्यात आली आहे.  

मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच दारू आणि पानांची  दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये रेड झोन मध्ये असणाऱ्या मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार नाही आहे.  

सध्या देशात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक रेड झोन आहे. महाराष्ट्रात 14, उत्तर प्रदेशात 19, दिल्ली मध्ये 11 ठिकाणी रेड झोन आहेत. 

दरम्यान, ग्रीन झोन जिल्ह्यांमध्ये दारूची दुकाने, पानाची टपरी याच बरोबरीने  50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच 17 मे पर्यंत च्या लॉक डाऊन च्या काळात डेपोमध्ये पन्नास टक्केच कर्मचारी काम करतील. 

Related Stories

पंजाबमध्ये दोघांना शस्त्रास्त्रांसह अटक

Patil_p

सातारकरांना मोठा दिलासा : पंधरा जण कोरोनामुक्तहून घरी

Archana Banage

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार विरोधात लूक आऊट नोटीस

Archana Banage

भयावह रुग्णवाढ : देशात 24 तासात 2.61 लाख बाधित

datta jadhav

पंतप्रधान उद्या वाराणसीतील कोविड लसीकरण मोहिमेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद

Tousif Mujawar

“शिवसेना, सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतो म्हणून माझं निलंबन”

Archana Banage