Tarun Bharat

ग्रीन झोनमध्ये 3 मे नंतर मद्यविक्रीची शक्यता

Advertisements

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार विचाराधीनराज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार विचाराधीन

प्रतिनिधी / बेंगळूर

लॉकडाऊनमुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी 3 मे नंतर मद्यविक्री सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. रेड झोनमध्ये समाविष्ट असणारे जिल्हे वगळता इतर ठिकाणी एमएसआयएल आणि मद्य दुकानांमध्ये मद्यविक्री केली जाण्याची शक्यता आहे. मद्यविक्री केवळ ‘पार्सल’ देण्याचा विचार सरकार करीत असल्याचे समजते.

राज्याच्या महसूलात भर घालण्याची गरज असल्याने 3 मे नंतर मद्यविक्री सुरू करावी, असा दबाव सरकारवर येत आहे. त्यामुळे अबकारी मंत्री एच. नागेश यांनी कोलार येथे पत्रकारांशी बोलताना मद्यविक्रीबाबत 3 मे नंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे. कोरानाचे रुग्ण नसलेल्या ग्रीन झोनमध्ये मद्यविक्री करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मद्यविक्री बंद झाल्यामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे, असे त्यांनी सांगितले

ग्रीन झोनमध्ये मद्यविक्री सुरू करा

लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये सशर्त मद्यविक्री करण्यास मुभा द्यावी. त्यामुळे अबकारी कररुपाने मिळणाऱया उत्पन्नात थोडीफार सुधारणा होईल. राज्याची आर्थिक स्थितीला पाठबळ मिळेल.

– सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री

Related Stories

कंग्राळी बुद्रुक येथे नऊ जणांना क्वारंटाईन

Patil_p

क्लबरोडवरील स्मार्ट सिटीचे काम अर्धवट

Amit Kulkarni

रस्ते किती दिवसांत दुरुस्त करणार?

Amit Kulkarni

अल्पसंख्याकांच्या आरक्षणात वाढ करण्याची ‘अंजुमन’ची मागणी

Amit Kulkarni

अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

Patil_p

तालुक्यात दिवाळीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!