Tarun Bharat

ग्रीन टी की लेमन टी

ग्रीन टी हा वजन घटवण्यासाठी पसंती मिळालेला चहा आहे. दुसरीकडे देशात बदलत्या वातावरणाप्रमाणे अनेक भागात लिंबू पिळून चहा प्यायला जातो. परंतु अनशापोटी कोणता चहा प्यायल्यास तो अधिक आरोग्यकारी ठरतो, असा प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना पडत असेल.

विशेषतः सकाळी उठलं की पहिला चहा लागतोच या प्रकारातल्या लोकांना तर हा प्रश्न नक्कीच भेडसावतो. याविषयी जाणून घेऊया.

थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी गरम गरम चहा प्यायल्यास आपला मूड ताजातवाना होतो. चहा पावडर, दूध आणि साखर घालून केलेला नेहमीचा चहा बहुतेक जण घेतात. केवळ सकाळीच नव्हे दिवसभरात लहर आली की प्यायला जातो. काही लोक हर्बल चहा आवडीने पितात. कधी काळी मिरी घालून, कधी लिंबाचा रस घालून तर कधी ग्रीन टी करून पितात.

लिंबू हे सिट्रस प्रकारातील फळ असून ते प्रतिकारक्षमता मजबूत करण्यास मदत करते. लिंबू शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत करते. लिंबू हे कमी कॅलरी असलेले फळ असल्याने साहाजिकच वजन कमी करण्यासाठी ते मदत करते.

अशाच प्रकारे लेमन टी मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर असते. त्यामुळे इन्सुलिनची निर्मिती वाढते. लिंबाचा चहा प्यायल्यास कार्डियोव्हॅस्क्युलर आजाराचे धोके कमी होतात. जीवाणू संसर्ग आणि विषाणूजन्य संसर्ग पासून सुरक्षा मिळते.

दुसरीकडे, ग्रीन टी आरोग्यकारी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी मदत करते. या चहामुळेही विषाणू आणि संसर्ग यांच्याविरोधात प्रतिकारक्षमता वाढते. हृदयाचे आरोग्य आणि ऑस्टियोपोरोसिससह अनेक आजारांचा धोका कमी होतो.

विविध अभ्यास आणि संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की ग्रीन टी प्यायल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगापासून शरीर सुरक्षित राहाते.

ग्रीन टी एक नैसर्गिक रक्त पातळ करणारा घटक म्हणून काम करतो. तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो.

सारांश, दोन्ही प्रकारचे चहा नैसर्गिक आणि औषधी आहेत. त्यामुळे दोन्ही चहाचे सेवन आरोग्यदायीच आहे. तथापि, अनेक लोकांना आम्लिय गुणधर्माचे पदार्थ सेवन केल्याने ऍसिडीटी आणि पोटात वायू होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे अशा लोकांनी लेमन टीपेक्षा ग्रीन टी प्यावा.

Related Stories

प्लेटलेटस् हव्यात…चिंता नको !

Kalyani Amanagi

ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई मॅक्स रुग्णालयात दाखल

datta jadhav

ट्रेडमिलवर धावताना…

Omkar B

कॉव्हिडची लस घेताना

Amit Kulkarni

राज्यात आरोग्य विभागाची मेगाभरती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Archana Banage

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असे sprouts

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!