Tarun Bharat

ग्रॅण्डमास्टर मॅमेडोव्हची आनंदवर बाजी

वृत्तसंस्था/ बाकू (अझरबेंजान)

येथे शनिवारपासून सुरू झालेल्या सातव्या गॅशिमोव्ह स्मृती आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अर्मेगेडॉनचा ग्रॅण्डमास्टर रॉफ मॅमेडोव्हने भारतीय ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदला रॅपिड लढतीत पराभूत केले.

सदर स्पर्धा रॅपिड तसेच ब्लिझ अशा प्रकारात खेळविली जात आहे. रॅपिड प्रकारातील आनंदने एक डाव जिंकला तर दुसऱया डावात त्याला पराभव पत्करावा लागला. दोन डावांच्या या रॅपिड मिनी लढतीत ग्रॅण्ड मास्टर मॅमेडोव्हला पहिल्या डावात माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने 49 व्या चालीत पराभूत केले पण त्यानंतर त्याला दुसऱया डावात मॅमेडोव्हकडून हार पत्करावी लागली. रॅपिड प्रकारातील ही स्पर्धा 21 डिसेंबरला संपणार असून त्यानंतर ब्लिंझ प्रकारातील लढती 22 आणि 23 डिसेंबरला होणार आहेत.

Related Stories

एटीपी चषक सांघिक टेनिस इटली उपांत्य फेरीत

Patil_p

लिव्हरपूलची ऍटलेटिकोवर मात

Amit Kulkarni

इंग्लंड, पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

अचंता शरथ कमलची ‘खेलरत्न’साठी शिफारस

Patil_p

थॉमस चषक स्पर्धेत चीनची भारतावर मात

Amit Kulkarni

पंजाबविरुद्ध लढतीत आरसीबीसमोर प्ले-ऑफचे लक्ष्य

Patil_p