Tarun Bharat

ग्रॅहम थॉर्प अफगाण संघाचे प्रमुख प्रशिक्षक

Advertisements

वृत्तसंस्था/ काबुल

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने (एसीबी) इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांची अफगाण राष्ट्रीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

अलीकडेच झालेल्या ऍशेस मालिकेत इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून 0-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या नामुष्कीनंतर थॉर्प यांना सहायक प्रशिक्षकपदावरून डच्चू देण्यात आला होता. अफगाणचे अनेक आंतरराष्ट्रीय सामने होणार असून यासाठी इंग्लंडचे मध्यफळीतील माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली असल्याचे एसीबीने सांगितले.

थॉर्प यांनी इंग्लंडतर्फे शंभर कसोटी खेळल्या असून 16 शतकांसह 44.66 च्या सरासरीने त्यांनी 6744 धावा जमविल्या. नाबाद 200 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय 82 वनडेमध्ये 37.18 च्या सरासरीने 2380 धावा जमविल्या. त्यात 21 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच सरे कौंटीकडून खेळताना त्यांनी 21937 धावा जमविल्या, त्यात 49 शतकांचा समावेश आहे. एप्रिल 2011 तर सप्टेंबर 2019 या कालावधीत ते इंग्लंडचे फलंदाज प्रशिक्षक होते.

Related Stories

बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारीचे नाबाद शतक

Patil_p

ऑलिम्पिकसाठी भारताचे 190 सदस्यांचे पथक

Amit Kulkarni

इंग्लंडचा न्यूझीलंडवर निसटता विजय

Omkar B

फिडे स्वीस बुद्धिबळ स्पर्धेत हरिका आघाडीवर

Patil_p

इंग्लंड-पाकिस्तान पहिली टी-20 लढत रद्द

Patil_p

बांगलादेश सुपर-12 फेरीसाठी पात्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!