Tarun Bharat

ग्लासहाऊस नागरिकांसाठी कधी उपलब्ध होणार ?

Advertisements

शहर, उपनगरांमध्ये 17 हून अधिक ग्लास हाऊस

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेच्यावतीने शहरातील विविध उद्यानात आणि खुल्या जागांवर ग्लासहाऊसची उभारणी करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये 17 हून अधिक ग्लास हाऊस उभारण्यात आले आहेत. मात्र याचा उपयोग होत नसल्याने ते धूळ खात पडले आहेत. सदर ग्लास हाऊस नागरिकांच्या सेवेसाठी कधी उपलब्ध होणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शहरविकास अनुदानातून राज्य शासनाकडून 400 कोटी रुपये देण्यात आले. या अंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. त्याचबरोबर चौथ्या टप्प्यातील 100 कोटी अनुदानातून उद्यानाच्या विकासाबरोबर विविध उद्यानात आणि खुल्या जागांवर ग्लासहाऊसची उभारणी करण्यात आली आहे. विशेषत: उत्तर विभागातील उद्यानांमध्ये ग्लासहाऊसची उभारणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्याने राहते घर अपुरे पडत आहे. त्यामुळे लहान मोठे कार्यक्रम करण्यासाठी मंगल कार्यालयासाठी पैसे मोजावे लागत आहेत. विशेषत: गरजू आणि गरीबांना याचा अधिक भुर्दंड बसत आहे. अशा  नागरिकांना कौटुंबिक कार्यक्रम करण्यासाठी शहरातील विविध उद्यानात व खुल्या जागांवर ग्लास हाऊसची उभारणी करण्यात आली आहे. पण त्याचा उपयोग म्हणावा तसा होत नाही.

आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत

ग्लासहाऊस भाडेतत्वावर देण्यासाठी महापालिकेने भाडय़ाच्या रक्कमेचा दरही निश्चित केला आहे. पण सदर ग्लास हाऊस अद्यापही नागरिकांसाठी उपलब्ध नाही. काही ग्लासहाऊसमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. तर काही ठिकाणी गळती लागल्याने पावसाचे पाणी गळते. 17 हून अधिक ग्लास हाऊस उभारण्यात आले आहेत. पण यापैकी कोणत्याच ग्लासहाऊसचा उपयोग कार्यक्रमांसाठी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्लास हाऊससाठी कोटीचा निधी वापरण्यात आला आहे. पण त्याचा विनियोग पाहता शून्य आहे. वास्तविक पाहता नागरिकांना अल्प दरात ग्लासहाऊस उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र महापालिकेकडून याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे उद्यानात उभारण्यात आलेले ग्लास हाऊस केवळ शोभेचे बनले आहे. ग्लासहाऊसचा वापर केला जात नसल्याने धूळ साचली असून, काही ठिकाणी दुरूपयोग केला जात आहे. त्यामुळे ग्लासहाऊसच्या देखभालीसह गरजूंना ग्लास हाऊस उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक उपाय योजना राबविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related Stories

पहाटे पाऊस, दिवसभर उघडीप

Amit Kulkarni

अधिकाऱयांचा वाद; घरपट्टी वसुली ठप्प

Amit Kulkarni

मनपात येणाऱयांची थर्मल चाचणी

Patil_p

अलारवाडकडून जोरदार रस्ताकाम

Omkar B

सार्वजनिक वाचनालयातर्फे म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

Patil_p

ता.पं.कार्यकारी अधिकाऱयांकडून शौचालयांची पाहणी

Patil_p
error: Content is protected !!