Tarun Bharat

ग्लोबल टीचर रणजित डिसले यांच्या आमदारकीसाठी शिफारस करणार

प्रतिनिधी / बार्शी

बार्शी येथील रहिवासी आणि सोलापूर जिल्हा परिषदेतील परितेवाडी या गावांमध्ये कार्यरत असणारे शिक्षक रणजीतसिंह डीसले यांना युनेस्को आणि वारको फाउंडेशनचा ग्लोबल टिचर अवॉर्ड हा जाहीर झाल्याने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे बार्शी मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी रणजितसिंह डीसले यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले तर यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की रणजितसिंह यांनी महाराष्ट्राची नव्हे तर देशाचे नाव जगाच्या नकाशावर उज्वल केले आहे.

त्यांच्या या प्रयत्नाला सन्मान देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी शिफारस केली जाणार आहे. असे सांगितले यावेळी त्यांच्या समवेत बार्शी विधानसभा आमदार राजेंद्र राऊत , भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख बार्शी नगरपरिषद अध्यक्ष असिफ तांबोळी, बार्शी नगर परिषद सदस्य अरुण बारबोले, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मदन दराडे व इतर नगरसेवक सभापती व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या भेटीनंतर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सोजर शिक्षण मंडळाचे कार्यालय या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध प्रश्नांना उत्तरे दिली, यावेळी त्यांनी बोलताना सांगितले, रणजितसिंह भोसले यांच्या भेटीने समाधान व्यक्त करत दरेकर यांनी सांगितले की रणजीत डीसले यांना महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाच्या विशेष पुरस्कारासाठी शिफारस केली जाणार आहे तर महाराष्ट्र विधान भवनामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी शिफारस सरकारकडे केली जाणार आहे.

तसेच जिल्हा परिषद शिक्षकांकडे आणि जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोण डीसले यांनी पूर्ण बदलून टाकला आहे. ऑनलाइन शिक्षण देत असताना ते सोपे सहज आणि मुलांना समजावे यासाठी रणजित डीसले यांनी केलेले प्रयत्न हे खरोखरच नावाजण्यासारखे आहेत. दरेकर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीचे सरकार हे एकत्र असल्याने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये त्यांचा विजय झाला आहे. तर भाजपासाठी ही चिंतनाची बाब असून यापुढे भारतीय जनता पार्टी येणार्‍या निवडणुकांना सामोरे जाईल आणि यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केला.

Related Stories

पालिकेत प्रशासक की मुदतवाढ

Patil_p

कुसुंबी मुरा रस्ता दगडी बांध घालून केला वाहतुकीसाठी बंद

Archana Banage

चला सातारा शहर बनवूया ‘कलरफुल’

Patil_p

संचारबंदी : वाहनधारकांशी अशोभनीय वर्तन, शाहुवाडी पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

Archana Banage

वीजदर कपातीची घोषणा फसवी : ६.७ टक्के दरवाढ होणार

Archana Banage

अवकाळीने शेतकयांचे कंबरडे मोडले.

Patil_p