Tarun Bharat

घंटागाड्यांच्या डिझेलसाठी लाखोंची उधळपट्टी

महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा आम आदमीकडून भांडाफोड

प्रतिनिधी / मिरज

मिरज आणि कुपवाड येथील एकूण 37 घंटागाड्या केवळ डिझेल भरण्यासाठी सांगलीवारी करत असल्याने या घंटागाड्य़ांवर वर्षाकाठी विनाकारण चार लाख, 10 हजार, 256 रुपयांची उधळपट्टी होत असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. आम आदमीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला यांनी माहिती अधिकारातून माहिती मागविल्यानंतर महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्य़ावर आला आहे. मिरज आणि कुपवाडमध्ये पेट्रोल पंप असताना सांगलीतील पेट्रोल पंपावरच जावून डिझेल भरण्यामागचा हेतू काय? असा सवाल वसीम मुल्ला यांनी केला आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील दैनंदिन कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेकडून 77 घंटागाड्या कार्यरत आहेत. यापैकी कुपवाड 13 आणि मिरज शहरासाठी 24 घंटागाड्य़ांचा समावेश आहे. यातील बहुतांशी घंटागाड्य़ांचे पासिंग नुतनीकरणही रखडले असून, अनेक घंटागाड्या या परिवहन नियमांचा भंग करुन विनापासिंग फिरविल्या जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिकेने घंटागाड्य़ातील डिझेलसाठी सांगलीतील शंभर फुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंप निवडले आहे. परिणामी मिरज आणि कुपवाडमधील घंटागाड्य़ांना प्रत्येक मंगळवारी सांगलीला जावूनच डिझेल भरावे लागते.

Related Stories

उसने पैसे घेतलेल्या मानसिक तणावातून महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; पोलिसात गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

पाटणे फाटा येथे मोटरसायकल अपघातात एक ठार

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन

Archana Banage

Sangli : शेअर्स मार्केटच्या फंड्यातून पावणे सहा लाखांचा गंडा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : नगरसेवकाच्या त्रासामुळे जलअभियंता कुंभार यांनी सोडला पदभार!

Archana Banage

कोल्हापूर शहरात नवे रुग्ण शंभराच्या आत

Archana Banage