Tarun Bharat

घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी

पूजा साहित्य, फुले-फळांची विक्री अधिक : विविधरंगी घट खरेदीला महिलांची पसंती

प्रतिनिधी /बेळगाव

घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषतः देवीच्या पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, फुले, फळे, प्रसाद यांच्या खरेदीसाठी महिलांची वर्दळ वाढली होती. बाजारात भाजीपाला खरेदीबरोबरच फुले आणि फळांच्या खरेदीची लगबग पाहायला मिळाली.

शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौकात नागरिकांची रेलचेल वाढली होती. पूजेसाठी तांब्याचे घट याबरोबरच कलाकुसरीने सजविलेले विविध रंगांचे घट खरेदीला महिलांनी पसंती दिली. देवीची आरास करण्यासाठी लागणारी झेंडू, शेवंतीची फुले, वेण्या, हार खरेदीसाठी फुलांची मागणी वाढली होती. रास-दांडियाच्या खेळासाठी टिपऱया आणि पोशाखालाही मागणी वाढली होती. त्यामुळे पांगुळ गल्लीत तरुणाईची वर्दळ दिसून आली.

यंदा नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यासाठी महिला आणि तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेषतः दांडिया आयोजनासाठी तरुणाईची लगबग पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवात रंग भरणाऱया टिपऱयांना मागणी वाढली आहे. त्याबरोबर विविध रंगांचे पोशाख, कुर्ता, टोप्या यांना पसंती दिली जात आहे. शहर आणि ग्रामीण भागात दुर्गामाता दौड उत्साहात साजरी करण्यासाठी तरुणाईने तयारी केली आहे.
यासाठी पांढऱया टोप्या, पोशाख, भगवे फेटे, रुद्राक्ष माळा यांना मागणी वाढली आहे. अलीकडे दौडमध्ये सहभागी होणाऱया तरुणाईची संख्या वाढत आहे. त्यामुळे दौडसाठी लागणाऱया साहित्याची मागणी अधिक होती.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी नवीन दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे प्रि-बुकिंग केले आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवीन वाहने खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे रविवारी काही नागरिकांनी नवीन वाहनासाठी बुकिंग केले. त्यामुळे शोरुम्समध्येही वर्दळ पाहायला मिळाली. 

Related Stories

बसस्थानकात पार्किंगअभावी गैरसोय

Amit Kulkarni

वनविभागातील जमीन सक्रम करून द्या ..!

Rohit Salunke

तहसीलदारांच्या वाहनचालकाची गळफासाने आत्महत्या

Patil_p

महिला मंडळ महिलांचे हक्काचे व्यासपीठ

Patil_p

संप परिवहन कर्मचाऱयांचा, फटका प्रवाशांना

Patil_p

पाठय़पुस्तके वेळेत मिळण्याबाबत संभ्रम

Amit Kulkarni