Tarun Bharat

घनदाट धुके, फेसाळणारे धबधबे ‘लाईव्ह’

Advertisements

जगप्रसिद्ध आंबोलीचे पर्यटन अनुभवता येणार घरबसल्या : आठ जुलैपासून नवा प्रयोग, स्थानिक तरुणाचा पुढाकार

विजय राऊत / आंबोली:

आंबोली हे थंड हवेचे जगप्रसिद्ध ठिकाण आहे. मात्र, गेली दोन वर्षे तसेच यंदाही कोरोनामुळे पय्zटकांना वर्षा पर्यटनाचा आनंद घेतला आला नाही. मात्र, आता आंबोलीतील पर्यटनस्थळे घरबसल्या एका क्लिकवर पाहता येणार आहेत. येत्या आठ जुलैपासून आंबोलीचे लाईव्ह दर्शन घडणार आहे. आंबोलीतील युवक निर्णय राऊत यांनी ही किमया घडविली आहे. ‘आंबोली टुरिझम लाईव्ह’द्वारे आपली आवडती पर्यटनस्थळे पाहण्यासाठी 2 लाख 35 हजारहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

आंबोली पर्यटनस्थळ काही वर्षांपूर्वी फक्त वर्षा पर्यटनासाठी राज्यात ओळखले जायचे. वर्षा पर्यटन हंगामातील तीन महिनेच येथे पर्यटन चालायचे. आंबोलीत मुख्य धबधबा, कावळेसाद पॉईंट, महादेवगड पॉईंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, नांगरतास धबधबा, सनसेट पॉईंट, शिरगावकर पॉईंट, राघवेश्वर पॉईंट एवढेच ‘साईटसीन’ करण्यासाठी पर्याय होते. मात्र, निर्णय राऊत याने आंबोली परिसरातील पर्यटनवाढीसह तसेच बारमाही पर्यटन होण्यासाठी नि:शुल्क आंबोली टुरिझमची निमिती केली. आंबोलीतील पर्यटनस्थळे जगभर नेली. तसेच बारमाही पर्यटनासाठी विविध संकल्पना राबविल्या. साहसी पर्यटनाचाही पाया रोवला. साहसी पर्यटन ऍक्टिव्हिटिज, इको टुरिझम, व्हिलेज टुरिझम, कृषी पर्यटन (ऍग्रो टुरिझम), साईटसीन, पर्यटन माहिती केंद्र, टेंट कॅम्पिंग, योगा, मेडिटेशन, पंचकर्मा, नेचर कॅम्प, बर्ड-बटरफ्लाय वॉचिंग, जंगल सफारी, नाईट सफर, जंगल ट्रेक, ऍनिमल वॉचिंग, नेचर ट्रेक, पठार ट्रेक, रॉक ट्रेक (बेसिक व हार्ड), बायोडाव्हर्सिटी कॅम्प, स्टडी/रिसर्च कॅम्प, टेंट कॅम्पिंग, जंगल टेंट, लेक साईट टेंट, जंगलातील व शेतातील/जंगल माची (निगराणी माळा), कॅम्प फायर, फोटोग्राफी कॅम्प, बैलगाडी सफर, घोडागाडी सफर, जीप सफर, ट्रक्टर सफर, मातीच्या घरातील अनुभव, मालवणी घरगुती चुलीवरचे जेवण. त्यासोबत गाईड सर्व्हिस, हॉटेल बुकिंग, घरगुती जेवण, होम स्टे, कार सर्व्हिस आणि आंबोली टू अदर प्लेस टूर व अदर प्लेस टू आंबोली तसेच हिडेन प्लेस आंबोली-चौकुळ-गेळे-कुंभवडे-खडपडे परिसरातील पर्यटनस्थळे एक्सप्लोर करणे, कॉर्पोरेट नेचर कॉन्फरन्स, इव्हेंटस व आदी 12 महिने उपलब्ध आहेत.

असे असेल आंबोली पर्यटन लाईव्ह

असंख्य पर्यटकांच्या मागणीमुळे आंबोली टुरिझममार्फत ऑनलाईन सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तथा आंबोली टुरिझम अधिकृत वेब पोर्टलवर आंबोलीतील नयनरम्य निसर्ग, विशेषत: मनमोहक घनदाट धुके, पावसाळय़ातील फेसाळणारा आंबोली मुख्य धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र (नदी उगम), महादेवगड पॉईंट/आंबोली घाट, कावळेसाद पॉईंट हे मुख्यतः लाईव्ह तसेच चौकुळ व्हिलेज (पठारे), बाबा धबधबा (कुंभवडे) व अन्य हिडन पॉईंट लाखो पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच रात्रीच्या अंधारातील आंबोलीचे विश्व देखील पाहता येणार आहेत. सोबत रात्रीच्या किर्र अंधारातील जीवांचा आवाज ऐकता येणार आहे. आंबोली मुख्य धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र (नदी उगम), महादेवगड पॉईंट/आंबोली घाट, कावळेसाद पॉईंट हे मुख्यतः लाईव्ह स्ट्रिमिंग केले जातील. तर चौकुळ, कुंभवडे परिसरातील पर्यटनस्थळे नियोजनानुसार प्रक्षेपित होणार आहेत. तसेच आंबोली परिसरातील आजवर प्रसिद्धीस न आलेल्या अनेक गोष्टी सर्वांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.

आंबोली, चौकुळ तथा गेळे परिसरातील मूळ स्थानिकांचे कल्चर, कलागुण, वैदू, आपत्कालीन प्रशिक्षण, नेचर प्रोग्राम्स, जीवन शैली, मेडिटेशन हेदेखील लाखो लोकांना पाहायला मिळणार आहेत. ‘आंबोली टुरिझम’कडून  ‘आंबोली पर्यटन लाईव्ह’ पाहण्यासाठी गेल्या सहा महिन्यात सुमारे 2 लाख 35 हजारांहून जास्त पर्यटकांनी नोंदणी केली आहे. यावेळी पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार आंबोलीतील त्यांच्या आवडीची पर्यटनस्थळे लाईव्ह स्वरुपात पाहता येणार आहेत.

‘आंबोली टुरिझम’ पोर्टल

‘आंबोली टुरिझम’चे पोर्टल लवकरच अद्ययावत होणार असून इंग्लिशसह मराठी व हिंदीतही उपलब्ध होणार आहे. तसेच आंबोलीची अधिकृत सविस्तर माहिती, जैविविधता आणि त्यातील विशेष नोंदी, पर्यटन, फूड्स, कोकण प्रॉडक्ट्स, आवश्यक सेवा, कृषी, हेल्प लाईन आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आंबोली परिसरात बनलेले अनेक घरगुती प्रॉडक्ट ‘आंबोली’ ब्रॅण्डखाली ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यातून रोजगाराच्या दृष्टीने एक छोटेसे पाऊल टाकले जाणार आहे.

Related Stories

रत्नागिरीत आणखी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde

मसुरे-मागवणे परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली

NIKHIL_N

पावसामुळे कारवांचीवाडीत झाड पडून घरांचे मोठे नुकसान

Patil_p

सामाजिक कार्यकर्त्या संध्या चिटणीस यांचे निधन

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : दापोलीच्या तापमानात चढ उतार

Abhijeet Shinde

महाआवास अभियान अंतर्गत ई गृहप्रवेश

NIKHIL_N
error: Content is protected !!