Tarun Bharat

घरकुलाचा हप्ता काढण्यासाठी अठराशेची लाच घेताना अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे जाळ्यात

Advertisements

प्रतिनिधी / माळशिरस

घरकुलाचा पाचवा हप्ता मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी करून अठराशे रुपयाची लाच स्वीकारताना बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी सहाय्यकास सोलापूरच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले.

तक्रारदार यांच्या बहिणीला प्रधानमंत्री आवास योजना सन २०१८ २०१९ घरकुल मंजूर झाले होते. त्यांनी घराचे कामही पूर्ण केले आहे. त्यांना या घरकुलाचे चार हप्ते मिळाले आहेत. सदरचा हप्ता लाभार्थ्यास मिळण्याकरिता ग्रामपंचायतीने अहवाल देखील सदर केला. परंतु गट विकास अधिकारी कार्यालय माळशिरस, अंतर्गत बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे यांनी बांधकाम पूर्ण केल्याचा दाखला देणेसाठी २ हजार रुपयाची मागणी केली.

याबाबत तक्रारदर यांनी सोलापूर एसीबीकडे दाखल केली. सदरची पडताळणी केली असता लाचेची मागणी करून १८०० लाच स्वीकारताना सुहास शिंदे यास रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधिक्ष्गाक राजेश बनसोडे .अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपाधीक्षक संजीव पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि श्रीमती कविता मुसळे, चंद्रकांत पवार,अतुल घाडगे, सनके,सुरवसे या पथकाने केली 

Related Stories

कोरोना बाधित महिलेचा जबाब घेण्यास गेलेल्या आशावर्कर्सला मारहाण

Abhijeet Shinde

‘लोन ॲप’च्या सुत्रधारांवर मोकानुसार कारवाई

datta jadhav

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील ‘त्या’ मायलेकींची आत्महत्या नसून खून झाल्याचे उघड

Abhijeet Shinde

इचलकरंजी येथील जवाहरनगरात चोरट्यांनी बंद घर फोडले

Abhijeet Shinde

Kolhapur; शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; अतिवृष्टीने विद्यापीठाचा निर्णय

Abhijeet Khandekar

करमाळा तालुक्यात १२ ठिकाणी दारू अड्ड्यांवर धाडी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!