Tarun Bharat

घरकुलातही लाच, ग्रामसेवक ताब्यात

तिसरा हप्ता मंजुरीसाठी आठ हजार रु. मागितले, ‘लाचलुचपत’ने रंगेहाथ पकडले

प्रतिनिधी / देवगड:

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या व्यक्तीकडून घरकुलाचा तिसरा हप्ता मंजूर करून घेण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना देवगड तालुक्यातील कोटकामते येथील ग्रामसेवक दीपक चिंतू केतकर (37) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग-सिंधुदुर्गच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोटकामते ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहात पकडले. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गचे उपविभागीय अधिकारी दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कोटकामते येथील तक्रारदार यांच्या वडिलांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर होण्याकरिता ग्रामपंचायत कोटकामते येथे अर्ज दिला होता. त्याप्रमाणे घरकुल मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता 15 हजार रुपये, दुसरा हप्ता  45 हजार रुपये जमा झाला आहे. तिसरा हप्त्याचे 60 रुपये मंजूर करून घेण्याच्या प्रस्तावासाठी ग्रामसेवक केतकर यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोटकामते ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक केतकर याला तक्रारदाराकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या पथकामध्ये पोलीस निरीक्षक मितीश केणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फाले, हवालदार रेवंडकर, परब, कांचन प्रभू, प्रथमेश पोतनीस यांचा समावेश होता.

Related Stories

‘ज्ञानदीप’च्या दोघांना बाळासाहेब कडोलकर यांच्याकडून पुरस्कार

Patil_p

वेतन रोखलेल्या शिक्षकांना दिलासा

NIKHIL_N

आजगांव येथे 15 ऑगस्टला जिल्हास्तरीय देशभक्तीपर समुहगीत स्पर्धा

Anuja Kudatarkar

गुहागर आगारातच बस पंक्चर, वाहतूक कोंडीत भर

Patil_p

पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य, केरोसीन

NIKHIL_N

दोडामार्गच्या श्रुती गवस ची अमेरिकेतील एव्हरी डेनिसन फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी निवड

Anuja Kudatarkar