Tarun Bharat

घरगुती सिलिंडर दर 25 रुपयांनी महाग

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली असून सुधारित दर तत्काळ लागू करण्यात आले आहेत. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचे दर आता 859.50 रुपयांवर पोहोचले आहेत. दिल्लीव्यतिरिक्त कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडर दर 886 रुपयांवर पोहोचला असून मुंबईत 859.50 रुपये झाला आहे.

दिवसागणिक वाढणाऱया महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. यापूर्वी 1 जुलैला सिलिंडर दरात 25.50 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर आता ऑगस्ट मध्यावधीतच पुन्हा 25 रुपयांनी दरवाढ झाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. 1 जानेवारीपासून ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत गेल्या आठ महिन्यात सिलेंडरच्या किंमतीत 165 रुपयांची वाढ झाली आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी 68 रुपयांनी वाढले होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.

डिझेल दरात कपात, पेट्रोल ‘जैसे थे’

घरगुती सिलिंडर दरात वाढ झाली असतानाच बुधवारी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 19 ते 21 पैशांनी कपात झाली आहे. मात्र पेट्रोलचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्याभरात प्रथमच डिझेल दरात बदल झालेला दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर 101.84 रुपये प्रतिलिटर इतका आहे. तर डिझेल दर 89.87 रुपयांवरून 89.67 रुपयांवर घसरला आहे.

Related Stories

मानवाधिकार आयोगाच्या पथकाला रोखले

Patil_p

उत्तराखंडात पावसाचा धुमाकूळ, 23 ठार

Patil_p

डब्ल्यूएचओला भारताचा तिसऱयांदा इशारा

Patil_p

‘भारत जोडो’मधून दीर्घ लढा देणार

Patil_p

शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात भारत जगात सहाव्या स्थानी

datta jadhav

छत्तीसगडमध्ये नक्षलींशी चकमक

Patil_p
error: Content is protected !!