Tarun Bharat

घरपट्टी भरण्यासाठी कॅन्टोन्मेंटवासियांना 8 जानेवारीची डेडलाईन

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट हद्दीतील मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. बहुतांश मालमत्ताधारकांची घरपट्टी थकीत असल्याने दि. 8 जानेवारी 2021 पूर्वी घरपट्टी भरणा करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने केले आहे. दिलेल्या वेळेत घरपट्टी भरणा न केल्यास वसुलीचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डने घरपट्टीत वाढ केली होती. मात्र सदर वाढ असंख्यपटीने असल्याने अनेक मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. काही मालमत्ताधारकांनी वाढीव घरपट्टीस आक्षेप घेऊन वाढीव घरपट्टी कमी करण्याची मागणी केली होती. पण आक्षेपाकडे दुर्लक्ष करून घरपट्टीवाढ जैसे थे ठेवण्यात आली आहे. तर शैक्षणिक संस्थांच्या इमारतींच्या घरपट्टीत मोठय़ा प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी देखील कॅन्टोन्मेंट बोर्डला निवेदन देऊन घरपट्टीत कपात करण्याची मागणी केली होती. याबाबत संरक्षण खाते आणि सदर्न कमांड पुणे यांच्याकडेही निवेदन दिले होते. याची दखल घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डला विविध सूचना करण्यात आल्या होत्या. पण याबाबत कोणती कार्यवाही केली याची माहिती देण्यात आली नाही. मात्र घरपट्टी वसुलीसाठी प्रकटन प्रसिद्ध करून दि. 8 जानेवारीपूर्वी घरपट्टी भरण्याची सूचना केली आहे. घरपट्टी भरणा न केल्यास दंडासह घरपट्टी वसुली करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

केएलई विद्यापीठाला नॅक सदस्यांची भेट

Amit Kulkarni

चैतन्यमय वातावरणात पार पडली दौड

Patil_p

दसऱयामुळे बाजारात कोटींची उलाढाल

Patil_p

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांचा दणका

Amit Kulkarni

अखिल भारतीय ढोर कक्कय्या महिला मंडळाची बैठक

Amit Kulkarni

संत मीरा, मुक्तांगण, चिटणीस, हेरवाडकर उपांत्य फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!