Tarun Bharat

घरफोडय़ांच्या सत्राने खळबळ

प्रतिनिधी/ बेळगाव

गणेशपूर, सहय़ाद्रीनगर परिसरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडय़ांच्या सत्राने परिसरात खळबळ माजली असून कॅम्प व एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनांची नोंद झाली आहे. शुक्रवारी चोरीच्या या घटना उघडकीस आल्या आहेत.

लक्ष्मीनगर-गणेशपूर येथील गुंडू प्रभाकर गुरव यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 3 लाखाचा ऐवज लांबविला आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक प्रभाकर धरमट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सहय़ाद्रीनगर येथेही चोरीची घटना घडली आहे. तृप्ती कागे यांचा बंगला फोडण्यात आला असून या घरातून नेमका कितीचा ऐवज गेला, याचा उलगडा झाला नाही. शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गणेशपूर परिसरात आणखी एक घर फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

४ डिसेंबरला छलवादी महासभेची पूर्वसभा..

Rohit Salunke

मानस फुटबॉल अकादमीकडे हल्याळ चषक

Amit Kulkarni

लॉकडाऊनमध्येही रेल्वेची मालवाहतूक सेवा सुरूच

Patil_p

भाग्यनगर येथे कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी

Amit Kulkarni

मतदार नोंदणी जागृतीसाठी ‘कानडीचा वरवंटा’

Patil_p

लॉकडाऊन शिथिल, मात्र 144 कलमानुसार जमावबंदी

Patil_p