Tarun Bharat

घरभाडय़ासाठी तगादा लावू नये

जिल्हाधिकाऱयांची सूचना

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनमुळे मजूर, कामगार व नोकरदारही अडचणीत आले आहेत. बरेच जण यामधील भाडेने घरे घेवून राहत आहेत. मात्र आता मजुरी आणि वेतन मिळत नसल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना भाडय़ासाठी जबरदस्ती करु नये, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. कोणीही तगादा लावला तर कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे साऱयांनाच आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कर्ज किंवा भाडे वसुलीसाठी तगादा लावणे चुकीचे आहे. कर्जवसुलीसाठी कोणीही जबरदस्ती केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. गेले तीन महिने काम नाही त्यामुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. त्याचा सर्वांनीच विचार करणे गरजेचे आहे. कोणीही जबरदस्ती करु नये, अशी सूचना त्यांनी केली आहे.

Related Stories

भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांची अमलबजावणी करा

Amit Kulkarni

महिन्यानंतरही मृत्यूबाबतची नोंद नाही!

Omkar B

तनिष्कच्या नव्या दालनाचा थाटात शुभारंभ

Amit Kulkarni

यल्लम्मा यात्रेतील सुविधांसाठी सहकार्य करा

Amit Kulkarni

अति घाई संकटात नेई…

Amit Kulkarni

बेळगावच्या विमानसेवा विस्तारीकरणासाठी प्रयत्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!