Tarun Bharat

घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी/ गुहागर :

बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या चक्रीवादळाचा गुहागर तालुक्याला जबर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातील सुमारे 80 फूट उंचीचा वायरलेस टॉवर या वादळात कोसळला. तसेच अनेक मार्गावर झाडे कोसळून वाहतूकही कोलमडली आहे. या टॉवरच्या दोन्ही बाजूला असलेली तहसील व सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये यातून बचावली आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

   गुहागर मुख्य मार्गावर झाडे कोसळल्याने मार्ग बंद अवस्थेत होते. यामध्ये गुहागर-वेलदूर मार्गावर रानवी येथे झाड कोसळल्याने दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद अवस्थेत होते. पालशेत-तवसाळ मार्गावरील वरवेली-आगरवाडी येथे झाड कोसळल्याने पालशेत-वेळणेश्वर-अडूर-चौसाळ मार्ग बंद होता. दुपारी अडीच वाजता जेसीबीच्या सहाय्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मार्ग खुला करण्यात आला.

 शहरातील वरचापाट मार्गावरील नगरसेवक समीर घाणेकर यांच्यासमोर झाड कोसळल्याने हा मार्ग बंद होता. तसेच अन्य मार्गावरही झाडे कोसळल्याने मार्ग बंद होते. नगरपंचायतीच्यावतीने बंद पडलेल्या मार्गावरील झाडे बाजूला करून रस्ता पूर्ववत करण्यात आला. समुद्र चौपाटीवरील अनेक सुरूची झाडेही जमीनदोस्त झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तहसील कार्यालयाच्या आवारातील 1995 साली उभारलेला वायरलेस टॉवर वादळामुळे कोसळला. ब्रॉडबॅँड सेवा सुरू झाल्यानंतर हा टॉवर बंद होता. चक्रीवादळामुळे पहाटे तीन वाजल्यापासून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. सर्व नेटवर्क बंद असल्याने तालुक्यातील संपर्क तुटला आहे.

Related Stories

वृद्धेची होऊनही परवड, प्रशासन मात्र गिरवतेय ‘अबकड’

NIKHIL_N

एसटी प्रवासी संख्या 16 हजाराच्या पार

Patil_p

पणदुरात ‘एक गाव-एक वाण’ उपक्रम

NIKHIL_N

पोलादपूरनजीक 50 फूट खोल भागात कार कोसळली

Abhijeet Khandekar

गोवा सरकारच्या परवानगीचे पत्र पालकमंत्र्यांनी दाखवावे!

NIKHIL_N

अपघातग्रस्त डबे हटवण्याचे काम युध्दपातळीवर

Patil_p