Tarun Bharat

घराची पारदर्शक सुंदरता…

काच आणि आरसे हे खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजु म्हणायला हव्यात. या दोन गोष्टींच्या वापराने गृहसजावटीची चमक आणखी उजळून निघते. गृहसजावटीत यांचा वापर कसा करायचा ते पाहु या लेखात.

ग्लास किंवा काच म्हटल्यानंतर आपली काळजी वाढते. ग्लास वा काच ही सांभाळायला जड असल्याने अनेकजण याला घराच्या अंतरंगात सामावून घेताना काळजीच जास्त घेतात. हाताळण्यास नाजूक कोणतीही गोष्ट अनेकजण घरात ठेवण्यास नाकारतात, हेही सत्य आहे. पण या गोष्टींनी सजावटीतील सुंदरता जी बहरते ती कैकपटीने अधिक असते. आज बाजारात उपलब्ध असणाऱया सुरक्षित कल्पक काच प्रकारांच्या माध्यमातून घर अधिक सुंदर करता येते. ग्लास व आरसे यांच्या माध्यमातून घराची चमक वाढवता येते. आपल्या गृहसजावटीच्या थीमअनुसार आपण ग्लासचा प्रकार निवडू शकतो. प्यायच्या पाण्याच्या ग्लासपासून ते सेंटर टेबलसारखी उत्पादने घरात समाविष्ट करता येतात. कलाप्रकारात मोडणाऱया काही ग्लास प्रकारांचा कल्पकपणे वापर केला जातो. विविध रंगसंगतीच्या काचांच्या वापरातून घराला श्रीमंती लुक मिळून जातो. आज यात प्लेन, टिंटेड, बॅक-पेंटेड, फ्रोस्टेड, इचड् आणि फॅब्रिक प्रकारचे ग्लास उपलब्ध आहेत.

फ्रोस्टेड ग्लास हा काहीसा दुधारी काचेचा प्रकार असतो. यात रंगसंगतीही भरपूर असते. यातून काही दिसणार नाही, हे नक्की. विविध रंगसंगती यात आढळून येते. ऍसीड व फ्ल्युरॉइडचा स्पे ग्लासवर मारलेला असतो. हा प्रकार अपारदर्शक गटात मोडतो.

बॅक-पेंटेड ग्लास हा साध्या ग्लासचाच प्रकार असतो. यात एक बाजु म्हणजे मागची बाजु रंगवलेली असते. यातही रंगविविधता दिसून येते. पर्ल फिनीश, शीमर व स्पार्कल प्रकारात ग्लास उपलब्ध असतो. टाइल्स वा लॅमीनेटस्च्या बदल्यात याचा वापर करता येतो. वॉर्डरोब शटर्स किंवा वॉशबेसीन कौंटरसाठीही याचा वापर केलेला पाहायला मिळतो.

इचिंग ग्लासचा प्रकारही लोकप्रिय आहे. डिझाइनर लुकसाठी याचा वापर होतो. खिडकीवर हा प्रकार वापरता येतो किंवा मग एखादं डिझाइनर शिल्पही कमाल दाखवून देणारं असतं.

फॅब्रिक ग्लासचा वापरही अंतरंगात करता येतो. पातळ कापड पारदर्शक ग्लासमध्ये दाब देऊन बसवलं जातं. विविध डिझाइन्स, पोत व रंगसंगतीत हा प्रकार उपलब्ध आहे. एखाद्या जागेचे सौंदर्य वाढवण्यात हा प्रकार उजवा ठरतो.

टींटेड ग्लासचा प्रकारही वापरता येतो. एका बाजुला फिल्म किंवा कोटींग केलेले असते. यातून प्रकाश जास्त आरपार होत नाही. बाहेरचा अतिरीक्त प्रकाश रोखण्याच्या कार्यासाठी हा ग्लास वापरता येतो.

आर्ट ग्लासचा प्रकार हा घराचे सौंदर्य कैकपटीने वाढवत असतो. डायनिंग रुम व किचन याठिकाणी याचा वापर करता येतो. तसेच लिव्हिंगरूम व बेडरूममध्येदेखील सौंदर्यवृद्धीसाठी हा प्रकार वापरता येतो. खिडकीसाठी याचा वापर करण्याबरोबर याची शिल्पे, फुलदाणी वगैरेही वापरता येतात. काचेचे झुंबरही घरात लिव्हिंगरूम, डायनिंग रूम आदीठिकाणी लावता येतं.

आरसे – कल्पक डिझाइनचे आरसे थोडे महागडे असले तरी यांनी घराचे रूप पालटू शकते. एखादी जागा दुप्पट दाखवण्याची किमया आरसेच करू शकतात. प्रकाश परावर्तीत करण्यात आरशांचा वाटा मोठा असतो.

Related Stories

शाळांजवळच्या घरांना मागणी

Patil_p

खरेदीदारांवर भार नाही

Patil_p

लिव्हिंगरूम सजावटीतल्या टाळायच्या चुका

Patil_p

देखभाल कराराचे महत्त्व

Patil_p

प्रकल्पांसाठी सहा महिने वाढीव कालावधी

Patil_p

भावनांपेक्षा भाववाढीकडे लक्ष द्या!

Patil_p