Tarun Bharat

घराच्या गच्चीवर लावला पाकिस्तानचा झेंडा; घरमालकाला अटक

Advertisements

ऑनलाईन टीम / देवास : 

मध्यप्रदेशातील देवास येथील शिप्रामध्ये एका घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत घरमालकाला अटक केली. 

फारुख खान असे या अटक करण्यात आलेल्या घरमालकाचे नाव आहे. त्यांच्यावर कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुआर, फारुख खान यांच्या 12 वर्षीय मुलाने घराच्या गच्चीवर पाकिस्तानचा झेंडा लावला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली. त्यानंतर झेंडा ताब्यात घेऊन घरमालक फारुख यांना अटक केली. फारुख यांच्या 12 वर्षीय मुलाने जनभावना भडकावण्यासाठी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाची पोलिसांसह महसूल विभागही चौकशी करत आहे.

Related Stories

समुद्रमार्गे 300 रोहिंग्ये इंडोनेशियात दाखल

datta jadhav

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात

datta jadhav

गुजरात निवडणुक : इसुदान गढवी आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

Abhijeet Khandekar

गैरसमज झाले असतील तर, फडणवीसांनी व्यक्त व्हावे- पंकजा मुंडे

Archana Banage

तरुण भारत सांगली आवृत्ती वर्धापन दिन विशेषांकाचे शानदार प्रकाशन

Archana Banage

पश्चिम बंगालमध्ये नियोजन आयोगाची स्थापना करणार

datta jadhav
error: Content is protected !!