Tarun Bharat

घरात पाणी गेलेल्यांना दोन दिवसात दहा हजार मिळणार

Advertisements

शासनाचे पंधरा कोटी 45 लाख आले, शेतीसह उर्वरित पूरग्रस्तांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार

प्रतिनिधी/सांगली

राज्य शासनाकडून सानुग्रह अनुदान वाटपासाठी 15 कोटी 45 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून तितकीच रक्कम जिल्हा प्रशासनाकडील शिल्लक निधीतून वापरण्यात येणार आहे. त्यामुळे महापुराचे पाणी घरात शिरलेल्यांना दहा हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु पूरबाधित आणि शेती नुकसानग्रस्तांना अद्यापही मदतीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

पंचनामे पूर्ण होतील त्याप्रमाणे दहा हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. शासन आणि जिल्हा प्रशासनाकडील निधी असा सुमारे तीस कोटी 90 लाखांचा निधी चार तालुक्यांना वितरीत करण्यात आला आहे. संबंधीत तहसिलदारांची बिलेही मंजुरीसाठी जिल्हा कोषागार कार्यालयात गेली असून मंजूर मिळताच सानुग्रह अनुदान वितरणाला सुरूवात होईल असे सांगण्यात आले.

शेती पंचनामे पूर्ण झाले आहेत. कृषि विभागाने त्याबाबतचा अहवालही जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. परंतु मदतीबाबत अद्याप शासन पातळीवरून निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर घरात पाणी गेलैल्या कुटूंबाना दहा हजार मिळणार असले तरी पूरबाधित आणि अपार्टमेंटमध्ये राहणाऱया स्थलांतरितांच्या वाटपासंदर्भात निधीच प्राप्त झाला नाही. त्यामुळे आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जुलैमध्ये कृष्णा वारणेला आलेल्या महापुराचा जिह्याला मोठा तडाखा बसला होता, त्यामुळे घरं आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पूरग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करण्यात आली होती, मात्र तीन आठवडÎानंतरही मदत न मिळाल्याने नाराजी वाढली आहे. अखेर 15 कोटी 45 लाखांचे राज्य शासनाचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तितक्याच रकमेची तरतुद करून सानुग्राह अनुदान वाटपाचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी चार तालुक्यातील तहसिलदारांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे.  

महापुराने सांगली शहरासह वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्मयातील 103 गावांना तडाखा बसला. कृष्णा आणि वारणा काठावरील गावं पाण्याखाली गेली. या परिस्थितीत तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाने पंचनामे सुरु आहेत. मात्र संथ गतीने सुरु आहेत. जिह्यात घर तर शेतीचे अद्यापही पंचनामे पूर्ण झाले नाहीत. पूर ओसरुन तीन आठवडÎांचा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असताना अद्याप पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.

 वाळवा आणि शिराळा तालुक्यात सानुग्रह अनुदान वाटप सुरू

वाळवा आणि शिराळा तालुक्मयातील पूरग्रस्तांना 10 हजाराचे सानुग्रह अनुदान खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरु झाली. उर्वरित भागतही दोन दिवसांत वाटप सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष घरात पाणी शिरलेल्या कुटुंबांचा अ वर्गामध्ये समावेश असून त्यांना अनुदान देण्यात प्राधान्याने देण्यात येणार आहे. घराच्या परिसरात पाणी आल्याने अथवा अपार्टमेंटमधील स्थलांतरित नागरिकांचा ब वर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे. अ वर्गातील कुटुंबातील मदत दिल्यानंतर ब वर्गाच्या कुटुंबांच्या खात्यावर 10 हजाराचे सानुग्रह अनुदान जमा केरण्यात येणार आहे.

Related Stories

सांगली : पाच जणांचा मृत्यू, 168 रूग्ण वाढले

Archana Banage

सांगली : खताचा विनापरवाना २१ लाखांचा साठा जप्त

Archana Banage

कुंडल ते बांबवडे दरम्यानचा राज्य महामार्ग राहणार बंद

Archana Banage

सांगली : पोलीस अधीक्षक `ऍक्शन मोड’मध्ये

Archana Banage

सांगली जिल्हा परिषदमध्ये 25 हजाराची लाच घेताना लिपिक जाळ्यात

Archana Banage

राज्यात थंडीचा कडाका वाढला; बहुतांश ठिकाणचं तापमान १५ अंशांखाली

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!