Tarun Bharat

घरावर झाड कोसळल्याने रेवोडा येथे एक जखमी

एक लाखाचे नुकसान

वार्ताहर / रेवोडा

रेवोडा मळीवाडा येथील गुरुदास सोनू कोलवाळकर यांच्या घरावर मंगळवारी दुपारी भेंडीचे झाड कोसळले. त्यात घरात काम करत असलेल्या गुरुदास कोलवाळकर यांच्यावर छप्पराची कौले पडल्याने ते जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व डाव्या बाजूच्या भुजाला जखम झाली. त्यांच्यावर कासगी इस्पितळात उपचार करण्यात आले.

कालपासून मान्सून पावसाला सुरुवात झाली. त्यात घराजवळ असलेले भेंडीचे सुके झाड अचानक कोसळले. त्यात घराची कौले, वासे व भितीचे मिळून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. रेवोडा पंचायतीचे सरपंच श्रीकांत मांद्रेकर यांनी येऊन पाहणी केली. म्हापसा अग्निशमन दलाचे जवान सुरज शेटगांवकर, नितीन चोडणकर, दत्तराज च्यारी, सिद्धेश परब, रोहन नाईक यांनी छप्परावरील झाड कापून वेगळे केले.

Related Stories

वास्को व परिसरात संचारबंदीतही मुक्त संचार, वाहनांची वर्दळ वाढली

Omkar B

नव्वद हजार लोकांना मिळणार नुकसान भरपाई

Amit Kulkarni

मोपा टॅक्सी स्टॅण्ड संदर्भात दुफळी नको

Amit Kulkarni

वास्को शहर व परिसरात चौथ्या दिवशीही उत्स्फूर्त बंद

Patil_p

कुर्टी बगलरस्ता बनला दाऊड्यांचा अड्डा

Amit Kulkarni

अधिवेशनासाठी दोन हजारांवर प्रश्न

Patil_p
error: Content is protected !!