Tarun Bharat

घरी रहा, सुरक्षित रहा : सतेज पाटील

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 12 एप्रिल रोजीचा वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करण्यात येणार नाही. जनतेने शुभेच्छा देण्यासाठी येवू नये, कारोना विरोधातील लढाईन नियम पाळून घरात रहा याच माला शुभेच्छा असतील असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

 आपण सर्वजण दरवर्षी वह्यांच्या स्वरूपात मला शुभेच्छा देऊन वाढदिवस उत्साहाने साजरा करता. आपले प्रेम आणि आपुलकीची भावना असते. हीच भावना मला नेहमीच लढायला बळ देते. पण सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व जगाबरोबर आपल्या देशातही गांभीर्याची स्थिती निर्माण झाली. पण कोल्हापूर जिल्हय़ातील सर्व जनतेने केलेले सहकार्य आणि जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्या कामामुळे  आपण सक्षमपणे कोरोनाचा मुकाबला करत आहोत.

  या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करायचा नाही, असे मी ठरविले आहे. आपल्या सर्वांची सुरक्षितता माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण मला प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये. कोरोना हद्दपार होणे आणि आपण सर्वजण सुरक्षित राहणे, याच माझ्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत. असे पालमंत्र्यांनी म्हटले आहे.

Related Stories

सकल हिंदू समाज उतरला रस्त्यावर

Patil_p

प्रलंबित प्रश्नांच्या नैराश्येतून इचलकरंजी येथील एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Abhijeet Khandekar

काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम पॉझिटिव्ह

Patil_p

दसरा-दिवाळीला व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून गिफ्ट; बॅरिकेटिंगमुक्त महाद्वार रोड होणार

Archana Banage

महाराष्ट्रासह मुंबईचे आर्थिक महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव : जयंत पाटील

Archana Banage

कोल्हापूर : यशवंतचे कोविड समर्पित रुग्णालय पन्हाळ्यासाठी वरदान – आरोग्यमंत्री यड्रावकर

Archana Banage