Tarun Bharat

घरेलू कामगारांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा

मालवण / प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाने एप्रिल 2021 पासून लॉकडाऊन जाहीर करताना महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना आर्थिक मदत म्हणून रुपये 1500 जाहीर केले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 672 नोंदीत घरेलु कामगारांना त्यांचे खात्यावर कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या कडून तशी आर्थिक मदत जमा करण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री भगवान साटम यांनी दिली.


एप्रिल 2021 पासून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात ब्रेक द चेन या शीर्षकाखाली लॉकडाऊन जाहीर करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी असंघटित कामगारांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये बांधकाम कामगार, रिक्षा व्यावसायिक व घरेलु कामगार यांचा समावेश आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी बांधकाम कामगारांना रुपये 1500 आर्थिक मदत मंडळ कार्यालय मुंबई येथून कामगारांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली.

त्याचप्रमाणे सन 2015 ते 2021 पर्यंत ज्या घरेलु कामगारांनी आपली घरेलु कामगार म्हणून नोंदणी केली होती अश्या घरेलु कामगारांना आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांचे जवळ 12 लाख 72 हजार एवढी रक्कम महाराष्ट्र शासनाकडून वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार आता पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीवित, नोंदीत व 60 वर्षाच्या आतील 672 घरेलु कामगारांना रुपये 1500 एवढी मदत त्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली आहे. तसेच उर्वरित घरेलु कामगारांचे बँक डिटेल्स त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आले आहेत. त्याही कामगारांना आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती श्री साटम यांनी दिली

Related Stories

कोकणातल्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी, गणेशोत्सवात रेल्वेच्या ६० ज्यादा गाड्या

Kalyani Amanagi

पाचलच्या मुख्याध्यापकांना पोषण आहार भोवला!

Patil_p

लक्षणे नाहीत, मग राहा घरीच!

NIKHIL_N

मुलीच्या मृत्यूनंतर पित्याची आत्महत्या

Patil_p

वागदेत कार अपघातात चौघे जखमी

NIKHIL_N

वि. स. खांडेकर विद्यालयात महिला दिन साजरा

Anuja Kudatarkar