Tarun Bharat

घर फोडून चार लाखांच्या ऐवज लंपास

Advertisements

प्रतिनिधी/ लांजा

लांजा तालुक्यातील सापुचेतळे वाडीलिंबु परिसरातील आठवडाभर बंद असलेले घर फोडून चोरटय़ांनी 2 लाख 82 हजाराचे दागिने व रोख 1 लाख रुपये असा 3 लाख 82 हजाराचा ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास चोरीची ही घटना उघडकीस आली.

  गणेश पांडूरंग चव्हाण (सापुचेतळे-वाडीलिंब़ु) यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. चव्हाण हे पत्नी व आईसह वाडीलिंबू येथील घरी राहतात़  27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ते पत्नी व आईला घेऊन रत्नागिरी येथील नातेवाईकांकडे गेले होत़े चव्हाण कुटुंबिय 3 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतून घरी परतले. सकाळी 7 च्या सुमारास ते घरी आले असता समोरील दरवाजाचे कुलुप तोडलेले व कडी-कोयंडा उचकटलेला दिसून आल़ा त्यामुळे चव्हाण पती-पत्नीने आत धाव घेतली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातील घरातील कपाट उघडून त्यातील 2 लाख 82 हजार रुपये किमतीचे दागिने व 1 लाख रुपयाची रोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल़े

   घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी लगेचच लांजा पोलीस स्थानकात याबाबची तक्रार दिल़ी त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय चौधरी, दिलीप पवार, श्रीकांत जाधव, चालक घडशी, सुतार यांनी वाडिलिंबु येथे घटनास्थळी जाऊन पाहणी केल़ी  चोरीचा अधिक छडा लाण्यासाठी रत्नागिरी येथून श्वान पथकाला पाचारण केले. मात्र उशीरापर्यंत ठोस काही हाती लागलेले नाही.

Related Stories

दापोलीतील दोघांसह 20 भारतीय येमेनच्या कैदेत

Patil_p

पूररेषेविरोधात दाखल झाल्या 13,300 हरकती!

Patil_p

आर्थिक संकटातील आंबा उत्पादकांची शासनाने घ्यावी दखल

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर; सायंकाळी नवे १० रुग्ण वाढले

Archana Banage

मुख्यमंत्री करणार आज जलविद्यृत प्रकल्प पाहणी

Omkar B

आता डी-मार्टमध्ये केवळ घरपोच सेवा सुरू राहणार!

Patil_p
error: Content is protected !!