डब्ल्यू एच ओचा इशारा, बीए-2 हा कोरोनाचा प्रकार मूळ कोरोनापेक्षा अधिक संसर्गजन्य, ही तिसऱया लाटेनंतरची शांतता
प्रतिनिधी / बेळगाव
ओमिक्रॉनचे पुढील भयानक रुप हे बीए-2 आहे. असा अंदाज केला जात आहे की, हा विषाणू मूळ कोरोना विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. बीए-2 सध्या 57 देशांमध्ये आढळून आला असून तो जगभर पसरून 10 आठवडय़ात जवळपास 9 कोटी लोकांना संसर्ग पसरवू शकतो इतका हा प्रबळ विषाणू आहे, म्हणून द वर्ल्ड हेल्थ आर्गनायझेशनने ज्या देशाने कोविडचे नियम शिथिल केले आहेत त्यांना सावधगिरीचा इशारा देत टप्प्याटप्प्याने नियम हटविण्यास सांगून गरज असल्यास नियंत्रण उपाय पुन्हा लागू करण्यास सांगितले आहे.
अनेक देशात ओमिक्रॉनचा संसर्ग अजून ही पसरला नाही व अनेक देशात अजून ही लसीकरण व्हावयाचे आहे. म्हणून नियम शिथिल करण्याची ही योग्य वेळ नाही. नियम घालताना ते काढताना सुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करावेत कारण हा विषाणू खूप जलगतीने संसर्ग पसरवतो, असे डब्ल्यूएचओच्या कोविड विभागाच्या संशोधिका मारीया करकोवे यांनी सांगितले.