Tarun Bharat

घाऊक महागाई दरात ऑक्टोबरमध्ये वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई दरात 12.54 टक्के इतकी वाढ झाली आहे. ही  वाढ उत्पादित वस्तू आणि कच्च्या इंधन तेलाचे दर वाढल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत सलग 7 महिने ही वाढ दोन अंकी राहिली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये घाऊक महागाई दर अवघा 1.31 टक्के इतका होता. सप्टेंबर 2021 मध्ये तो 10.66 टक्के इतका होता. मात्र, अन्नधान्यांचा आणि भाजीपाल्याचा महागाई दर घटल्याचे दिसून येत आहे.

कारखान्यांमध्ये उत्पादित होणाऱया वस्तूंच्या दरात 12.04 टक्के वाढ ऑक्टोबरात दिसून आली आहे. सप्टेंबरात ती 11.41 टक्के होती. कच्चे इंधन तेल ऑक्टोबरात 37.18 टक्के वाढ झाली. कच्च्या इंधन तेलाच्या दरात (क्रूड ऑईल) तब्बल 80.57 टक्के वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे केंद्रीय अर्थ विभागाने स्पष्ट केले.

अन्नधान्यांच्या दरात घट

ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबरच्या तुलनेत अन्न धान्ये आणि खाद्यपदार्थांच्या दरात घट झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला. अन्नधान्यांचा महागाई दर उणे 1.69 टक्के राहिला. भाजीपाल्याचे घाऊक दर सप्टेंबरच्या तुलनेत 18.49 टक्क्यांनी कमी झाले. तर कांद्याच्या दरात 25.01 टक्का घट झाली.

मागणीत वाढ

घाऊक महागाईचा दर वाढला असला तरी चिंतेचे कारण नाही. कारण मागणीत वाढ होत असून हे अर्थव्यवस्थेसाठी सुखावह लक्षण आहे, असा अभिप्राय काही तज्ञांनी दिला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात केल्याने महागाई कमी होण्यास साहाय्य होईल. या दरकपातीचा परिणाम नोव्हेंबरच्या महागाई दरांवर दिसून येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

700 जहाजांना नाकारला प्रवेश

tarunbharat

सौरभ कृपाल देशाचे पहिले समलैंगिक न्यायाधीश!

datta jadhav

रुसली गं बाई रुसली!

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाकडून जलद सुनावणीची योजना

Patil_p

साडेसात तासात 893 लोकांचे लसीकरण

Patil_p

80 लाख घरांची निर्मिती करणार

Patil_p