Tarun Bharat

घाऊक महागाई दरात किरकोळ घट

भाज्या मात्र महागलेल्याच

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

डिसेंबर महिन्यात घाऊक महागाई दर 13.56 टक्के राहिला आहे. नोव्हेंबरमधील 14.23 टक्क्यांच्या तुलनेत यात किरकोळ घट झाली आहे. परंतु हा दर सलग 9 महिन्यांपासून 10 टक्क्यांच्या वर राहिला आहे. भाज्यांच्या घाऊक किमतीत 31.56 टक्के महागाई दिसून आली आहे. नोव्हेंबरमध्ये महागाईचा हा आकडा 3.91 टक्के राहिला होता.

डिसेंबरमध्ये निर्मित उत्पादनांचा महागाई दर 10.62 टक्के राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये हा आकडा 11.92 टक्के राहिला होता. याचबरोबर मासे, मांस आणि अंडय़ांचा महागाई दर 6.68 टक्के राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 9.66 टक्के राहिला होता, यामुळे यात घसरणीची नोंद झाली आहे.

डिसेंबर 2021 मध्ये महागाईचा दर प्रामुख्याने खाद्यतेल, धातू, कच्चे तेल, रसायने आणि खाद्योत्पादनांसह वस्त्र, कागद आणि त्याच्या उत्पादनांमुळे वाढला असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तर कांद्याच्या किमती नोव्हेंबरच्या तुलनेत कमी झाल्याचे सरकारकडून प्रसिद्ध आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

कांद्याच्या किमतीतील महागाई दर 30.10 टक्क्यांवरून कमी होत 19.08 टक्क्यांवर आला आहे. बटाटय़ाच्या किमतीही घाऊक बाजारपेठेत कमी झाल्या आहेत. अशाचप्रकारे इंधन आणि वीज शेणीत नोव्हेंबरच्या तुलनेत यात घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये हा महागाई दर 39.81 टक्के होता, जो नोव्हेंबरमध्ये 32.30 टक्क्यांवर आला आहे.

खाद्यमहागाई वाढली

खाद्यमहागाई दर 6.70 टक्क्यांवरून वाढत 9.24 टक्के झाला आहे. मागील वर्षाच्या एप्रिलपासून आतापर्यंत घाऊक महागाई दर 10 टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर सर्वाधिक 14.23 टक्क्यांवर पोहोचला होता. किरकोळ महागाई दराचा आकडा बुधवारीच प्रसिद्ध करण्यात आला होता. यात डिसेंबरमध्ये हा दर 5.59 टक्के राहिला, नोव्हेंबरमध्ये हाच आकडा 4.91 टक्के इतका होता.

Related Stories

‘तौत्के’चे अतितीव्र वादळात रुपांतर

Patil_p

साखर निर्यात अनुदानाला मंजुरी

Omkar B

साऱयांची दृष्टी नंदीग्रामवर केंद्रीत

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटनेत 15 जण ठार

Patil_p

गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर

Archana Banage

पंजाबमध्ये मतदान पूर्ण

Patil_p