Tarun Bharat

घानी चित्रपटात तमन्ना भाटिया

Advertisements

दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेजचा चित्रपट

दक्षिणेतील अभिनेता वरुण तेज सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘घानी’वरून चर्चेत आहे. याच्या चित्रिकरणात तो व्यस्त आहे. अशा स्थितीत आता अभिनेत्री तमन्ना भाटियाचे नाव या चित्रपटासाठी निश्चित झाले आहे. तमन्ना या चित्रपटात स्पेशल डान्स करताना दिसून येणार असल्याची चर्चा आहे. ‘कोडथे’ असे या गाण्याचे शीर्षक असून ते लवकरच प्रदर्शित केले जाणार आहे. या गाण्याला थमन एस. यांच्याकडून संगीतबद्ध करण्यात आले आहे. तर हे गीत रामजोगय्या शास्त्राr यांनी लिहिले आहे.

अभिनेत्रीने ट्विटरवर कोडथे गाण्यातील स्वतःचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. यात ती अत्यंत सुंदर दिसून येत आहे. घानी हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. घानी चित्रपटात अभिनेता वरुण तेज कोनिडेला याच्यासोबत अभिनेत्री सई मांजरेकर देखील झळकणार आहे. सईचा दक्षिणेतील हा पहिलाच चित्रपट असणार आहे.  हा चित्रपट बॉक्सिंवर आधारित असून यात जगपति बाबू, निम्मा उपेंद्र आणि सुनील शेट्टी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील.

Related Stories

वरुण धवनला सलमान खानला OTT वर पाहायचे नाही, हे आहे मोठे कारण

Archana Banage

दख्खनचा राजा ज्योतिबामध्ये मोठय़ा ज्योतिबाची एण्ट्री

Patil_p

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये येणार ट्विस्ट

Patil_p

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णने गाठला 300 भागांचा टप्पा

Patil_p

अभिनेता संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास

Patil_p

…तर आता तुझे करिअर कसे बनते जान सानू तेच बघतो : अमेय खोपकर

Tousif Mujawar
error: Content is protected !!