Tarun Bharat

घोटाळे बाहेर काढण्यासाठी दोन दिवसांनी जाणारच – सोमय्या

प्रतिनिधी / कराड :

मु्ख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी मला गैरकायदेशीर अडवून ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. नामदार हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथे आज आगमन होणार आहे. ते दवाखान्यात होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यात किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा झाला तर दौरात गनिमी काव्याने हल्ला होऊ शकते असे लेखी पत्र मला दिले. माझ्यावर हल्ला कोणा करणार? हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करणार होते. ते कोण गुंड आहेत का? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

हसन मुश्रीफ यांच्यावर मी जे आरोप केले आहेत. त्याची चौकशी सुरू झाली आहे. १२७ कोटी त्यांच्या कंपनीत आले याचे उत्तर दिले नाही. मुश्रीफ परिवाराच्या सदस्यांच्या नावे फक्त दोन कोटी रूपये आहेत. बाकीचा पैसा घोटाळ्याचा आहे. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज कारखान्यात शंभर कोटींचा घोटाळा केला आहे. या कारखान्याची कागदपत्रे उद्या ईडीकडे देणार आहे. 2020 मधे कोणतेही व्यवहार न होता हा कारखाना ब्रिक्स इंडियाला देण्यात आला. कोणताही दमडीचा अनूभव नसताना हा कारखाना त्यांना चालवायला देण्याचे कारण म्हणजे मुश्रीफ यांचे जावई याचे या कंपनीत आहेत. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा काढणार आहे.

माझ्यावर ठाकरे-पवारांची दडपशाही
हे सरकार ठाकरे आणि पवार चालवतात. त्यामुळे हे या घोटाळ्याला जबाबदार आहेत. मला माझ्या मुलूंडच्या घरी स्थानबद्ध करण्यात का आले? हे अजुनही मला कळालेल नाही. मला कोल्हापूरला जाण्यावर बंदी का केली? जर माझ्यावर हल्ला होणार याची माहिती जर सरकारला असेल तर त्यांनी हल्ला करणारांवर कारवाई का केली नाही.

पारनेर, जरंडेश्वरला जाऊन पाहणी करणार
आता मी पारनेरच्या कारखान्याला भेट देणार आहे. त्या कारखान्यातही कोट्यावधींचा घोटाळा झाला आहे. 30 तारखेला अजित पवार यांनी घेतलेल्या जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करायला मी जाणार आहे.

तक्रार करायला कागला जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दडपशाही सुरू आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा या दडपशाहीला जबाबदार आहेत.
सरसेनापती कारखाना कोल्हापूर हद्दीत असल्याने मला तिथेच तक्रार करावी लागणार आहे. हा घोटाळा काढण्यासाठी मला कोल्हापूरला जावे लागणार आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यासाठी मला कागल पोलीस स्टेशनला जावे लागणार आहे असे मला माझ्या वकिलांनी दिली. राहिला मानहानीच्या दाव्याचा मला आत्तापर्यंत सात दावे माझ्यावर झाले आहेत.

मुश्रीफ घोटाळ्यावर उत्तर देत नाहीत
मंत्री मुश्रीफ हे मी केलेल्या घोटाळ्यांवर उत्तर देत नाहीत. ते शंभर कोटींच्या दाव्याची मला भिती दाखवत आहेत. मात्र त्यांच्या या दाव्यांना मी घाबरत नाही.

Related Stories

सातारा : चोरेतील सेवानिवृत्त जवानाच्या खात्यातून साडेपाच लाख रुपये लांबविले

datta jadhav

सातारा पालिकेची वाढीव घरपट्टी आकारणी स्थगित

Patil_p

वारसदारांच्या नोकरीचा मार्ग झाला मोकळा

Patil_p

कृष्णा हॉस्पिटलमधून 23 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

Patil_p

नागठाणेत कोरोनाचा शिरकाव होण्याची धास्ती

Archana Banage

रहिमतपुरचा आठवडी बाजार आजपासुन सुरू

Archana Banage
error: Content is protected !!