Tarun Bharat

घोडावत गूळ कारखान्याकडून ऊसाला प्रतिटन २८४० रुपये दर जाहीर

प्रतिनिधी / जयसिंगपूर

चिपरी (ता. शिरोळ) येथील घोडावत फूड्स इंटरनॅशनल प्रा.लि.च्या गुळ पावडर आणि खांडसरी प्रकल्पाच्या ऊसाला प्रतिटन २८४० रुपये एकरकमी दर जाहीर करण्यात आला. गुळ पावडर आणि खांडसरी उद्योग असूनही परिसरातील सहकारी साखर कारखान्यांच्या सरासरी दराचा विचार करुन हा दर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती, प्रकल्पाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत यांनी पत्रकारांना दिली.
घोडावत म्हणाले, यंदाचा हा तिसरा हंगाम असून याआधीही ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना समाधानकारक एकरकमी दर दिला आहे. वाहनधारक, तोडणी कामगार यांचीही बिलेही वेळेत अदा केली आहेत. गेल्या दोन हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने प्रकल्पासाठी ऊस पुरवठा केला आहे. हा प्रकल्पच गुळ पावडर आणि खांडसरीचा असल्याने सहकारी साखर कारखान्यांप्रमाणे ऊसाला एफआरपी आणि साखरेला मुल्यांकनाचा आधार असतो. मात्र, गुळ पावडर आणि खांडसरीला हा आधार नसल्याने गुळाच्या दरावर ऊसाचा दर निश्चित करावा लागत आहे. मात्र, तरीही सहकारी साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्याचा निर्धार केला आहे.

यावर्षी दोन लाख टन गाळपाचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. घोडावत उद्योग समुहाकडून चालविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या हिताचेच काम केले जाणार आहे. भविष्यातही प्रकल्प व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांमध्ये दृढ विश्वासाचेच नाते निर्माण होईल असे सांगून ते म्हणाले, यंदाच्या तिसऱ्या हंगामाचा प्रतिटन २८४० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत एकरकमी दरच दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. यापुढील काळातही सहकारी साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर देऊन शेतकर्यांचा विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही देखील श्री घोडावत यांनी दिली. यावेळी प्रकल्प प्रतिनिधी सुनील शहा, राजेंद्र नांद्रेकर, श्री वाबळे, शेती अधिकारी श्री बिरनाळे आदी उपस्थित होते.   

Related Stories

कोल्हापूर : हुपरीत कोरोनाचा पाचवा बळी

Archana Banage

सतेज पाटील यांना रोखण्यासाठी भाजपची फिल्डिंग

Abhijeet Khandekar

रामलिंग आळते येथील जल,माती अयोध्येला जाणार

Archana Banage

अन्यथा गुऱ्हाळ घरं बंद ठेवणार

Archana Banage

कोल्हापूर : ऊस तोडणीसाठी मजूर देतो म्हणून १२ लाखाला फसवणाऱ्या इसमास अटक

Archana Banage

कोरे फार्मसीमध्ये रॅगिंग,महिला लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा या विषयीचे मार्गदर्शन

Archana Banage