Tarun Bharat

घोरपडांची शिकारप्रकरणी सहा जण ताब्यात

प्रतिनिधी/ फोंडा

आडपई-दुर्भाट येथील जंगल परिसरात घुसून तीन घोरपडांची शिकार केल्याप्रकरणी उड्डो-केळशी येथील सहाजणांना काल शनिवारी फोंडा वनखात्याने ताब्यात घेतले आहे. त्य़ाच्याकडून तीन मृत घोरपडे, शिकारीसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे, पिकास, कोयता व इतर सामुग्री जप्त करण्यात आली आहे. 

पेद्रु रॉक झेवियर (52),मार्टीन जोसमारी सिल्वेरा (62), नाझारेथ झावियर (42), आग्नेला कायतानो गामा (30), फ्रान्सिस्को साल्वादोर कोलास्को(32) अशी  पाच संशयितांची नावे असून त्याच्यासह एका अल्पवयीनांचा समावेश आहे.

होडीमार्गे दाखल होऊन कुत्र्याच्या सहाय्याने शिकार

  मागील काही महिन्यापासून वन्य जनावरांच्या शिकारीसाठी सदर टोळी केळशी  येथून होडीच्या सहाय्याने जुवारी नदी ओलांडून आडपई-दुर्भाट जंगलात दाखल होत असे. सदर टोळी काल शनिवारी दुपारच्या सुमारास आडपई डेंगरमाथ्यावर हिंडत असल्याची टिप वनखात्याला मिळाली होती. त्यानुसार वन अधिकारी दीपक बेतकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली टिमने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

यावेळी संशयितांकडून तीन मृत घोरपडे, धारदार कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्यासोबत दोन पाळीव कुत्रेही असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सदर टोळीने श्वानच्या सहाय्याने पाठलाग करून घोरपडांची शिकार करण्याचे सत्र आरंभले होते. त्यानंतर मांसाची विक्री करीत असे.

घोरपडच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून वन्यजीवन संरक्षण कायद्याच्या अनुसुची 1 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्राण्याची शिकार करणे हा दंडनीय गुन्हा आहे. सदर गुन्हय़ासाठी 7 वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती उपविभागीय वन अधिकारी आनंद जाधव यांनी    पत्रकारांशी बोलताना दिली.

Related Stories

कुंडई चिकलपाईण शेतीच्या बांधाला मोठी भगदाडे

Amit Kulkarni

रोडरोमियो युवकांतर्फे फोंडय़ातील उड्डापुलावर दारूपाटर्य़ा; निसर्गमित्रातर्फे स्वच्छता

Amit Kulkarni

समिल वळवईकर यांच्याकडून दिवाडी बेटावर ऍम्ब्यलन्स सेवा

Amit Kulkarni

गुडे शिवोली येथील होमकुंडास 70 वर्षे पूर्ण

Amit Kulkarni

जॉन्सन फर्नांडिस यांचा ‘टीएमसी’त प्रवेश

Amit Kulkarni

गोव्याच्या जनतेशी संवाद साधूनच काँग्रेसचा जाहीरनामा

Amit Kulkarni