Tarun Bharat

घोळसगाव येथे पाच एकर ऊस जळाला; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

तरुणांच्या सुदैवाने ८ एकर जळण्यापासून वाचला

प्रतिनिधी/अक्कलकोट

अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव शिवारात बुधवारी (ता. ९) सकाळी अकराच्या सुमारास ५ एकर क्षेत्रात लागवड केलेल्या उसाच्या शेताला आग लागली.या आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले. मात्र, वारा वाहत असल्याने आगीत संपूर्ण ऊस खाक झाला. यासोबत ठिबक सिंचनचे पाइप व इतर साहित्य ही जळाले.घोळसगाव येथील गिरमलप्पा परशेट्टी ३ एकर व अरविंद मंगळूरे २ एकर असे दोन्ही मिळून ५ एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. काही दिवसांनी ऊसतोडणीचे नियोजन केले जात असताना, बुधवारी (ता.९ ) अकराच्या सुमारास उसाच्या शेताला आग लागल्याचे वृत्त गावात येऊन धडकले.ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी मदत केली. शेतमालकही घटनास्थळी पोचले. वाराही वाहत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले.सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यात यश आले. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही.

Related Stories

सोलापूर शहरात २९ तर ग्रामीणमध्ये १७१ रुग्णांची भर; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

Archana Banage

अण्णा हजारेंच्या मागण्या योग्यच!

prashant_c

आयपीएल सट्टयातील 38 लाखांची रोकड पोलिसांकडून जप्त

Archana Banage

करमाळा शहरात आज एकही पॉझिटिव्ह नाही

Archana Banage

राज्यात पुढील ४ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज

Archana Banage

पंढरपुरात 11लाख 17 हजाराची रोकड सापडली

Archana Banage