Tarun Bharat

चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार

Advertisements

बेळगाव : चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे हिंडलगा येथील नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष प्रा. एम. के. पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक थोरात, चंदगड बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे चेअरमन एकनाथ पाटील, ज्ये÷ सल्लागार निंगाप्पा पाटील होते. प्रारंभी चेअरमन एकनाथ पाटील यांनी संघटनेच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य डी. बी. पाटील यांचा सत्कार अध्यक्ष एम. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. एन. एस. पाटील यांचा सत्कार अशोक थोरात यांच्या हस्ते झाला. सुमन बुधाजी राजगोळकर यांचा सत्कार व्यवस्थापिका छाया पाटील यांच्या हस्ते झाला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरुप होते. यावेळी डी. बी. पाटील व एन. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुमन राजगोळकर यांनीही सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी गंगाधर कंग्राळकर, भागोजी गावडे, सुनील पवार, प्रफुल्ल शिरवळकर, पी. सी. पाटील, अनंत पाटील, मारुती गावडे, उमाजी शिरगावकर, महेश कत्याण्णावर, सुरेश राजगोळकर, एम. पी. पाटील यासह संचालक, सल्लागार उपस्थित होते. विवेक पाटील यांनी आभार मानले.

Related Stories

कार्तिक काटेचा जितू गुज्जरवर एकलांगीवर विजय

Amit Kulkarni

एक्स्ट्रीम स्पोर्ट्स, के. आर. शेट्टी किंग संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

केएलई एमबीएतर्फे मानवतावादी दिन साजरा

Amit Kulkarni

येळ्ळूरमधील जेष्ठ नागरिक रामचंद्र पाटील यांचा सत्कार

Patil_p

खानापूर भागात बलिदान मासची सांगता

Amit Kulkarni

लॉकडाऊनचे गांभीर्य हरवले का?

Patil_p
error: Content is protected !!