Tarun Bharat

चंदगड तालुक्मयातील ऊस वादळी पावसाने जमीनदोस्त

प्रतिनिधी / चंदगड :

चंदगड तालुक्मयात गेल्या दोनतीन दिवसात मुसळधार वादळी पावसाने मोठय़ा प्रमाणात ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. हजारो एकरातील ऊस जमीनदोस्त झाला आहे.

यावषी कोरोनाचं संकट असतानाही शेतकऱयांनी ऊस मोठय़ा कष्टाने चांगला काढला होता. लॉकडाऊनमुळे शहरातून परतलेल्या युवकांनीही घरी आराम न करता ऊस पिक जोमाने उभे करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. अनेक प्रकारची खते, औषधे, फवारण्या करुन वेगवेगळे नवीन प्रयोग केले होते. खतांचा आणि औषधांचा खर्चही बऱयापैकी होता. यावषी दरवषीपेक्षाही ऊसाचे जोमदार पिक आले होते. मात्र वादळी पावसाने भुईसपाट झाला आहे. पाऊस आणि वादळ तालुक्मयातील ऊस उत्पादक शेतकऱयांसाठी मोठे संकट ठरला आहे. ऊस जमीनीला लोळल्याने त्याची वाढ खुंटणार आहे. शेतकऱयांना कर्ज फेडणेही कठिण जाणार आहे. ऊसाबरोबरच भात, भुईमूग, फळबागा यांचेही वादळी पावसाने नुकसान झाले आहे. ज्या प्रकारे शासनाने राज्याच्या इतर भागातील शेती व फळबागांची नुकसान भरपाई तेथील शेतकऱयांना दिली आहे. त्याप्रमाणे तालुक्मयातील ऊस व इतर पिकांचे पंचनामे करुन त्वरित चंदगड तालुक्मयातील शेतकऱयांना नुकसानभरपाई दिली जावी. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे.

Related Stories

मनपा कर्मचाऱयांसाठी पीपीई किट उपलब्ध

Amit Kulkarni

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सप्टेंबरमध्ये घेणे बंधनकारक ?

Archana Banage

वसती योजनांतून घरे मंजूर करा

Patil_p

पॅरा टेबलटेनिस स्पर्धेसाठी संजीव हम्मण्णावर फ्रान्सला रवाना

Amit Kulkarni

बसवण कुडचीतील रस्ताकाम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Omkar B

बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धेत वैष्णवी, अनिल, प्रिणू, साहील, ऋतुराज, सानिका विजेते

Amit Kulkarni