Tarun Bharat

चंदगड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल परीट निलंबित

प्रतिनिधी / कोल्हापूर

सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करुन लग्नाचे आमिष दाखवत इच्छेविरुध्द शरीरसंबंध ठेवून त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहुल दीपक परीट (रा. दत्त कॉलनी कागल) याला मंगळवारी रात्री उशीरा निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी सांगितले की, परीट हा विवाहित आहे. त्याची फेसबुकच्या माध्यमातून पीडित तरुणीची ओळख झाली. त्यातून दोघांत प्रेमसंबध निर्माण झाले. त्याने उचगाव येथे लॉजवर नेवून बलात्कार केला. या तरुणीचे अश्‍लील फोटो मोबाईलवर काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी त्याच्या विरोधात गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. निलंबित कॉन्स्टेबल परिट सध्या चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत होता.

Related Stories

”व्वा! मोदीजी व्वा ! खासदार पण महागाईमुळे चूल वापरायला लागले”

Archana Banage

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात नागरी सत्कार

Abhijeet Khandekar

बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाने मदत करावी : बी जी मांगले

Archana Banage

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्येही पुईखडी येथे घोडागाडी शर्यती

Archana Banage

सत्ता आल्यास मराठा समाजाला आरक्षण – चंद्रकांत पाटील

Archana Banage

`शिक्षक, पदवीधर’ महाविकास आघाडी एकत्र लढणार : सतेज पाटील

Archana Banage