Tarun Bharat

चंदन चोरांची टोळी गजाआड

वार्ताहर / कास :

बामणोली भागातील आपटी गावच्या हद्दीत चंदनाच्या झाडांची अवैधरित्या तोड करण्यासाठी आलेल्या टोळीच्या मुसक्या ग्रामस्थांच्या सतर्कतेने मेढा पोलिसांनी आवळल्या.

याबाबत मेढा पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, व आपटी गावचे पोलीस पाटील शामराव यशवंत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून, जगन्नाथ किसन सुतार (वय 40, रा.जोंगटी ता.पाटण), प्रकाश कृष्णा सपकाळ (40 रा.नेवकणे आरल ता.पाटण), किरण कृष्णात डुबल (23 रा.धारेश्वर दिवशी ता.पाटण), आकर लाल हरप्रसाद मकान (29 मुळ रा.67/09 ग्राम बिरूहली पोस्ट निटरा राज्य मध्य प्रदेश), विरन ग्यानसिंग आदिवासी (20 रा.कुठे ता. रेठी जि.कठणी रा.मध्य प्रदेश), नरदेश जवाहरलाल आदिवासी (22, रा.मु.कुठे ता.रेठी जि.कठणी रा.मध्य प्रदेश) सध्या सर्व रा.मरळी कारखाना ता.पाटण या सहा जणांच्या टोळक्याला अटक करण्यात आली आहे.

हे सर्व आरोपी सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास सुमारास आपटी गावच्या हद्दीतील म्हारकी नावाच्या शिवारातील शेतात चंदनाच्या झाडांची तोड करत होते. स्थानिक लोकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा मँक्स गाडी (HM 11 H 8002), तसेच एक हजार पाचशे रुपये किंमतीचा एक चंदनाच्या लाकडाचा तोडलेला अंदाजे 2 फुट लांबीचे व सुमारे 11 इंच जाडीचे लाकुड, एक कुऱ्हाड, करवत पाते असा मुद्देमाल जप्त केला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गायकवाड करत आहेत.

Related Stories

साताऱ्याचा पारा वाढला

datta jadhav

शहरात पूरक पोषण आहाराचे 4 हजार 527 लाभार्थी

Amit Kulkarni

कोंबडी पळाली पैसे घेऊन…

datta jadhav

साताऱ्यात ऑक्टोबरमध्ये वृक्ष संमेलन

datta jadhav

कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणे आले अंगलट ; पाचजणांना अटक

Archana Banage

प्रियांका मोहिते तेनसिंग नोर्गे पुरस्काराने सन्मानित

datta jadhav
error: Content is protected !!