Tarun Bharat

चंदीगढवरुन हरियाणाचा पंजाबवर पलटवार

चंदीगढ / वृत्तसंस्था

चंदीगढ पंजाबला देण्यात यावे या पंजाब सरकारच्या मागणीला हरियाणाने आपल्या विधानसभेत प्रस्ताव संमत करुन प्रत्युत्तर दिले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर नवे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी पंजाब विधानसभेत चंदीगढची मागणी करणारा प्रस्ताव संमत करुन घेतला होता.

यावर पलटवार करण्यासाठी मंगळवारी हरियाणा विधानसभेत चंदीगढचे सध्याचे केंद्रशासित प्रदेश हे स्वरुप कायम रहावे आणि सध्याप्रमाणेच चंदीगढ ही पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी असावी असा प्रस्ताव संमत करण्यात आला. यासाठी हरियाणा विधानसभेचे एक दिवसाचे विषेश अधिवेशन अयोजित करण्यात आले होते. चंदीगढवर जितका अधिकार पंजाबचा आहे, तितकाच अधिकार हरियाणाचाही आहे. त्यामुळे पंजाबकडून केली जाणारी मागणी अवैध आणि एकांगी आहे, असे प्रतिपादन हरियाणा सरकारने केले आहे.

हरियाणा विधानसभेत हा प्रस्ताव एकमुखाने संमत करण्यात आला. काँगेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनीही या प्रस्तावाचे समर्थन केले. त्यांनी पंजाब सरकारवर चंदीगढसंबंधीच्या त्याच्या भूमिकेसाठी जोरदार टीका केली. चंदीगढ ही दोन्ही राज्यांची राजधानी असून तिचे हे स्वरुप गेली कित्येक दशके कायम आहे. त्यात परिवर्तन करण्याची मागणी बेकायदेशीर आहे. आम आदमी पक्ष हेतुपुरस्सर दोन राज्यांमध्ये विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. आजवर कधी त्या पक्षाने ही मागणी केली नव्हती. आता पंजाबमध्ये सत्ता हाती आल्याने त्या पक्षाने आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी टीका पंजाब सरकारवर या प्रस्तावावरील चर्चेत करण्यात आली आहे.

Related Stories

कोचीतील लोकांना आता धुळीचा त्रास

Patil_p

आंध्रात बस अपघातात सात वऱहाडींचा मृत्यू

Patil_p

सागर राणाच्या हत्याकांडात सुशील कुमारसोबत सहभागी असलेल्या चार जणांना बेड्या

Archana Banage

काँग्रेस कार्यकर्त्यांचा राजभवनांना घेराव

Amit Kulkarni

गुरमीत राम रहीमची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल; उपचारानंतर पुन्हा जेलमध्ये रवानगी

Tousif Mujawar

राजस्थानमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 7376 वर 

Tousif Mujawar