वार्ताहर / चंदूर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. येथील.
गावचावडी जवळ राहणाऱ्या सौरभ बाळगोंडा पाटील याने घराजवळील कारखान्यात असणाऱ्या कांडीमशीनच्या खोलीत गळफास घेतला. ही घटना आज सकाळी १० च्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सौरभ हा ईलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.


previous post