Tarun Bharat

चंद्रकांत बांदेकर खून प्रकरणातील संशयिताच्या मुसक्या आवळल्या

गुजरात येथून संशयित आरोपी जयपुरी गोसाई याला अटक : दीड महिन्यानंतर पेडणे पोलिसांच्या तपासाला यश ,चाकूसह मोबाईल व सोनसाखळीही हस्तगत

प्रतिनिधी /पेडणे

तोरसे येथील चंद्रकांत बांदेकर खून प्रकरणी दीड महिन्यानंतर संशयित आरोपी म्हणून गुजरात येथील जयपुरी गोसाई याला दोन दिवसांपूर्वी गुजरात येथे अटक करुन पेडण्यात आणले.

पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी म्हणजेच 2 जुलै 2021 रोजी चंद्रकांत बांदेकर यांचा खून झाला होता. पेडणे पोलीसांकडून या प्रकरणी गेला दीड महिना तपास सुरू होता. याबाबत

गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने कसून तपास केल्यानंतर मोपा चंद्रकांत बांदेकर हत्या प्रकरणातील आरोपी जयपुरी गोसाई (वय 24 वर्षे) हा अहमदाबाद-गुजरात येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे जाऊन पोलीस पथकाने संशयित आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. जून 2021मध्ये गोव्यात तो आला होता. जेव्हा त्याच्याकडे पैसे संपले तेव्हा त्याने अहमदाबादला परतण्याचा निर्णय घेतला आणि परत जात असताना त्याने पत्रादेवी येथे अनोळखी दुचाकीकडे लिफ्ट मागितली होती. त्याची सोनसाखळी पाहून त्याला लुटण्याचा मोह झाला आणि तो लुटण्यासाठी त्याने आरोपीला भोसकले आणि त्याच्या मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला.

सुरुवातीला तपासादरम्यान प्रकरणात कोणतेच धागेदोरे नव्हते तरी सीसीटीव्ही फुटेजचा एकमेव पुरावा होता तो म्हणजे मयत व्यक्तीने अनोळखी व्यक्तीला ऍक्टिवावर लिफ्ट दिली हे स्पष्ट झाले होते.

पोलिसांनी सुगावा लागण्याच्यादृष्टीने सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यासाठी आणि संशयास्पद व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार केली. तांत्रिक आणि मानवी बुद्धिमत्तेच्या सखोल विश्लेषणानंतर, महाराष्ट्रातील अमरावती येथे एक संशयित सापडला. पोलिस निरीक्षक राहुल परब आणि लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर गोवा आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांद्वारे ताबडतोब आंतरराज्य ऑपरेशन सुरू करण्यात आले. अखेरीस, या आंतरराज्य ऑपरेशनाला यश येऊन जयपुरी गोसाई म्हणून ओळखला जाणाऱया संशयित आरोपीच्या गुजरात अहमदाबादमध्ये मुसक्या आवळल्या, अशी माहिती पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.   खून करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू संशयितकडून ताब्यात घेण्यात आला. तर खून केलेल्या चंद्रकांत बांदेकर यांची सोनसाखळी महाराष्ट्रात ज्याला विकली होती. त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे, अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली.

Related Stories

कोकणीतून नामफलक लावण्याचा कारवार नगरपालिकेचा ठराव

Amit Kulkarni

कारापूर साखळी येथील श्री शांतादुर्गा देवीचा आज वार्षिक सप्ताह

Amit Kulkarni

आप, तृणमूल या भाजपपुरस्कृत शक्ती

Amit Kulkarni

सभापती पदासाठी दोघांचे अर्ज

Amit Kulkarni

मध्यप्रदेशची गोव्यावर व्हीजेडी पद्धतीने 45 धावानी मात

Amit Kulkarni

बेकायदेशीर हातगाडय़ांवर मडगाव पालिकेची कारवाई

Patil_p
error: Content is protected !!