Tarun Bharat

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली ;राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


मुंबई \ ऑनलाईन टीम

अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज गुरूवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दारूबंदी उठवण्याला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे जवळपास ३ लाख निवेदने देखील आली होती.

यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, दारूबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू सेवन आणि त्याची विक्री वाढली होती. तरुण वर्ग त्याच्या आहारी जाऊ लागला होता, तर महिला-लहान मुले या व्यवसायात उतरले होते. परिणामी जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली होती. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार दारुबंदी करण्यात आली आहे.

२०१५ सालापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आली आहे. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी ३० हजार निवेदनं आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. यामध्ये दारूबंदी का उठवली जावी, या कारणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

भाजपकडून महानगरपालिकेतील कचरा घोटाळ्य़ाचा भांडफोड

Abhijeet Khandekar

अंबाबाई दक्षिणा पेटीत 67 लाख 65 हजार रुपये प्राप्त

Abhijeet Khandekar

सावंतवाडी येथील प्रसिद्ध केटरिंग व्यवसायिक प्रदीप सुकी यांचे निधन

Anuja Kudatarkar

सचिन वाझेंना ‘एनआयए’कडून अटक

datta jadhav

”भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसाला मुंबईत परप्रांतीय ठरवतील”

Archana Banage

बाळासाहेब थोरातांनी घेतली शरद पवारांची भेट

Archana Banage