Tarun Bharat

‘चंद्रमुखी 2’मध्ये दिसणार कंगना रनौत

चालू महिन्यात सुरू होणार चित्रपट

अभिनेत्री कंगना रनौत आता तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी 2’मध्ये दिसून येणार आहे. 2005 मध्ये प्रदर्शित चंद्रमुखी या चित्रपटाचा हा सीक्वेल असणार आहे. यासंबंधीची माहिती कंगनानेच सोशल मीडियावर दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पी. वासू करणार आहे. तर कंगनासोबत या चित्रपटात तमिळ अभिनेता राघव लॉरेन्स दिसून येणार आहे. राघवला कंचना 1 आणि कंचना 2 तसेच कंचना 3 यासारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जाते.

2005 साली प्रदर्शित चंद्रमुखी चित्रपटात रजनीकांत आणि ज्योतिका सरवनन यांनी अभिनय केला होता. चंद्रमुखी हा 2004 साली प्रदर्शित आपटामित्रा या चित्रपटाचा रिमेक होता.

कंगना डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे. इमरजेन्सी चित्रपटाच्या कामातून बेक घेत ती या चित्रपटाचे काम सुरू करणार आहे. तर जानेवारीमध्ये इमरजेन्सी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाल्यावर चंद्रमुखी 2 च्या उर्वरित चित्रिकरणात ती सामील होणार आहे.

चंद्रमुखी 2 या चित्रपटाची निर्मिती लायका फिल्म्स करणार आहे. या चित्रपटासंबंधी कंगना अत्यंत उत्सुक आहे. पी. वासू यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला अत्यंत सुदैवी समजते असे कंगनाने म्हटले आहे. कंगना लवकरच ‘तेजस’ या चित्रपटात दिसून येणार आहे. याचबराब्sार इमरजेन्सी या चित्रपटात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तीच करतेय.

Related Stories

रितेश-जेनेलियाच्या कंपनीवर भाजपचा गंभीर आरोप; अवघ्या 10 दिवसात भूखंड मंजूरी कशी?

Archana Banage

‘बोनस’ 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

tarunbharat

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

Archana Banage

आयेशाला विमानतळावर आलेला अनुभव

Patil_p

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उत्पादने

Patil_p

सख्खे शेजारीमध्ये रंगणार अनोखा खेळ

Patil_p