Tarun Bharat

चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाचे नाव निश्चित ?

मेरठ  / वृत्तसंस्था :

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाशी साधर्म्य असणाऱया बहुजन आझाद पक्ष  (बीएपी) या नावावर सहमती झाली आहे. तसेच आझाद बहुन पक्ष हे नावही सुचविण्यात आले आहे. पण बीएपी या नावावरच आज होणाऱया सुकाणू समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पश्चिम उत्तरप्रदेशातील एखाद्या जिल्हय़ातून नव्या पक्षाची घोषणा होणार आहे. सहारनपूर चंद्रशेखर यांची जन्म तसेच कर्मभूमी आहे. तर मेरठ शहराला पश्चिम उत्तरप्रदेशातील राजकीय राजधानी मानले जाते.

 राजकारणात लक्षवेधी प्रवेश करण्याचा चंद्रशेखर यांचा प्रयत्न आहे. चंद्रशेखर यांचा हा नवा पक्ष मायावतींसाठी डोकेदुखी निर्माण करणार आहे. पश्चिम उत्तरप्रदेशातील दलित समुदायात चंद्रशेखर यांचा प्रभाव निर्माण झाला आहे. पण जाटव समुदायात मायावतींचे असलेले प्रभुत्व चंद्रशेखर यांना भेदता आलेले नाही.

मायावतींचा किल्ला भेदण्याची तयारी

मेरठ जिल्हय़ातील दौऱयात चंद्रशेखर यांनी बसपच्या अनेक नाराज नेत्यांची भेट घेतली आहे. त्यांचा हा दौरा नव्या पक्षाच्या घोषणेच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. 15 मार्च रोजी राजकीय पक्षाच्या घोषणेवेळी पश्चिम उत्तरप्रदेशातील अनेक दिग्गज नेते त्यांच्यासोबत जोडले जाऊ शकतात. विशेषकरून बसपमधील नेत्यांवर आझाद यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

बसपमध्ये खळबळ

चंद्रशेखर यांच्या सक्रीयतेमुळे बसपच्या अंतर्गत संघटनेत खळबळ निर्माण झाली आहे. मेरठमधील चंद्रशेखर यांच्या हालचालींवर पोलीस तसेच गुप्तचर विभागाचीही नरज आहे. चंद्रशेखर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद आहे. मायावती यांनी बसपमधून हकालपट्टी केलेल्या नेत्यांना सोबत घेण्याचा चंद्रशेखर यांचा प्रयत्न आहे.

Related Stories

फक्त ईश्वराचा विचार करत राहणाऱयाच्या मनातला भेदभाव आपोआप नष्ट होतो

Patil_p

यासिन मलिकला फाशी की जन्मठेप?, एनआयए कोर्ट काही वेळात देणार निर्णय

Archana Banage

हवामानाचा अंदाज लवकरच अचूक

Patil_p

उत्तराखंड : लष्करी वाहतुकीचा पूल गेला वाहून

datta jadhav

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहीनबागेतील आंदोलनाला पोलिसांकडून ब्रेक

tarunbharat

श्रद्धाच्या हत्येची अफताबकडून कबुली

Patil_p