Tarun Bharat

चंद्रशेखर कोयंडे यांचे निधन

सांस्कृतिक क्षेत्रातील हाडाचा कलाकार हरपला

वेंगुर्ले (वार्ताहर)-

वेंगुर्ले गिरपवाडा येथील मूळ रहिवासी व सुंदरभाटले मायबोली हॉटेल येथील निवासी, माजी उपनगराध्यक्ष तथा स्वरसिंधु या सांस्कृतिक व्हॉटसअँप ग्रुपचे अँडमिन चंद्रशेखर लक्ष्मण कोयंडे (56) यांचे मुंबईतील कांदिवली येथील चारकोप रुग्णालयात त्यांना अस्वस्थ वाटून लागल्याने दोन दिवस उपचार घेत असताना सोमवार दि. 28 फेंब्रुवारी रोजी रात्रौ. 1.15 वाजता मॅसिव्ह हार्ट अँटकने अकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी, 3 भाऊ, वहिनी, 2 बहिणी, भावोजी, पुतणे, पुतण्या, भाचे, भाच्या असा परीवार आहे.वेंगुर्लेतील मातोश्री कला क्रिडा मंडळाचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष पद भुषवित होते. तसेच ते एल. आय. सी. चे जुने एजंट व चेअरमन क्लब मेम्बर पदापर्यत पोहोचले होते. . त्यांच्या अकस्मित जाण्याने गायन क्षेत्रातील एक व्यक्तीमत्व हरपले आहे. त्यामुळे वेंगुर्ले शहरांत, तालुक्यांत व जिल्ह्यात चंद्रशेखर कोयंडे यांच्या अकस्मित निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.बोवलेकर कॅश्यू फॅक्टरीतील कर्मचारी संतोष कोयंडे, कॅम्प म्हाडा येथील निष्ठावान शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते संदिप कोयंडे यांचे ते भाऊ होत.

Related Stories

दापोली बसस्थानकातील दुकानाला आग

Patil_p

आंबेगाव शाळा नं १ चा दहीहंडी उत्सव ठरला यादगार

Anuja Kudatarkar

राजापूर शहराला पुन्हा पुराचा वेढा

Patil_p

आकर्षक मोटार क्रमांकासाठी आता 5 लाख मोजा!

Patil_p

केंद्रीय पथकाकडून वेंगुर्ल्यातही पाहणी

NIKHIL_N

रत्नागिरी : खेडमध्ये कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावतोय

Archana Banage