Tarun Bharat

चंद्राच्या कक्षेतील बदलामुळे येणार पाऊस -पूर

न्यूयॉर्क

 अमेरिकेतील प्रत्येक समुद्रकिनारी पुराच्या लाटा निर्माण होत असून त्याकरिता चंद्राच्या कक्षेत होणारा बदल हेच प्रमुख कारण असल्याचे नासा या अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे. याचा परिणाम हवामान बदलात दिसून येत असून समुद्रपातळीत वाढही होताना दिसते आहे. नासा व हवाई यूनिव्हर्सिटी यांनी वरील कारणांचा अभ्यास करून त्याविषयीची माहिती ‘नेचर क्लायमेंट चेंज’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध केली आहे. चंद्रावरील कक्षेतील बदलाचा परिणाम पृथ्वीवर पूर येण्यात दिसणार आहे. येत्या दशकात जोरदार वादळी पाऊस व पूराचे प्रमाण वाढलेले दिसेल, असेही अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेतल्या किनारी भागामध्ये 2030 पर्यंत त्याचे परिणाम गंभीरपणे दिसतील. देशातील पायाभूत सुविधा, मालमत्तांचे अपरिमीत नुकसान होणार असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियात डेल्टा व्हेरियंटचा फैलाव

Patil_p

4 साल बाद…

Patil_p

टोकियो : उच्चांकी रुग्ण

Patil_p

हुवाईच्या सीएफओंच्या सुटकेनंतर 2 नागरिकांची चीनकडून सुटका

Patil_p

चीन जगातील सर्वात मोठी नौदल शक्ती

Patil_p

अमेरिका : चिंता नको

Patil_p