Tarun Bharat

चंद्रावर चीनने फडकविला झेंडा

Advertisements

जगातील दुसरा देश ठरला : 51 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनने चंद्राच्या भूमीवर स्वतःचा झेंडा रोवून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा चीन हा जगातील दुसरा देश ठरला आहे. जुलै 1969 मध्ये अमेरिकेच्या अपोलो-11 मोहिमेदरम्यान नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले होते. त्यानंतर बज एल्ड्रिन हे चंद्रावर उतरले होते. या मोहिमेदरम्यान चंद्रावर अमेरिकेचा झेंडा फडकविण्यात आला होता.

चीनने चंद्रावर स्वतःचा झेंडा रोवण्यासह या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. हा झेंडा 90 सेंटीमीटर लांबीचा आणि 1 किलो वजनाचा आहे. परंतु अमेरिकेची 1969 मधील चंद्रावरील मोहीम हा मानवयुक्त होती, तर चीनची मोहीम मानवरहित आहे.

या मोहिमेदरम्यान दुसऱयांदा चंद्राच्या पृष्ठभागावरून एखादी सामग्री आणली जात आहे. चीनच्या जांग-5 या अंतराळयानाने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी आर्मस्ट्राँग यांच्या मोहिमेदरम्यान चंद्रावरून मृदा आणली गेली होती. तर चीनच्या मोहिमेंतर्गत यानाने चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने एकत्रित केले आहेत. या यानाने स्वतःची चंद्रावरील कामगिरी आटोपून माघारीचा प्रवास सुरू केला आहे. चीनच्या अंतराळ संस्थेने त्याची छायाचित्रे प्रसारित केली आहेत.

अंतराळसंस्थेने प्रसारित केलेल्या छायाचित्रांमध्ये लँडरमधून असेंडर विलग होताना दिसून येतो. त्यानंतर यानातील झेंडा स्वयंचलित पद्धतीने रोवण्यात आला आहे. सोव्हिएत संघाने 1976 मध्ये लूना 24 मोहीम प्रक्षेपित केली होती. या मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावरून 200 ग्रॅम मृदा आणि दगडाचे नमुने प्राप्त करण्यात आले होते.

चीनच्या चंद्र मोहिमेच्या अंतर्गत प्राप्त नमुन्यांच्या मदतीने तेथील भूगर्भीय संरचना आणि उत्पत्तीविषयी माहिती जाणून घेण्यास मदत होणार आहे. याचबरोबर चंद्रावरील ज्वालामुखींशी संबंधित प्रश्नांची उकल करण्यासही मदत मिळणार आहे. तसेच ब्रह्मांडाची निर्मिती आणि त्याच्या रहस्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही शोधता येणार आहेत.

Related Stories

‘डीबीटी’चे आयएमएफकडून कौतुक

Amit Kulkarni

मुस्लीम देशांचा पाकिस्तानला झटका

Patil_p

अमेरिका : स्थिती नियंत्रणाबाहेर

Patil_p

युएईत विदेशी पर्यटकांना प्रवेश मिळणार

Patil_p

“निवडणुका संपणार, सरकारचे खरे रुप दिसणार”

Abhijeet Khandekar

मथुरेत ‘देव’सुद्धा विद्यार्थी

Patil_p
error: Content is protected !!