Tarun Bharat

चक्क एसटी आगारातच कचऱयाचा ढिग

प्रतिनिधी/ सातारा

 साथीचे रोग किंवा रोगराई पसरू नये, याकरीता आरोग्य विभागातर्फे विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. पण शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या (एसटी) आगारातच चक्क कचऱयाचा ढिग साठला आहे. यामुळे या परिसराच्या आवारात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच येथून प्रवास करणाऱया प्रवाश्यांतर्फे ही आरोग्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

 एसटी आगाराची स्वच्छता करणाऱया कर्मचाऱयांतर्फे या भागाची स्वच्छता करून सर्व कचऱयाची एका ठिकाणी साठवणूक करण्यात येते. त्यानंतर हा कचरा पालिका कर्मचाऱयांतर्फे कचरा डेपोत घेऊन जाण्यात येतो. पण मागील काही दिवसांपासून या कचऱयाची योग्य वेळेत उचल न झाल्याने, या भागात कचऱयाचा ढिग साठला आहे. त्यातच या कचऱयाच्या ठिकाणी बसेस ही उभारण्यात येतात.

 सध्या पावसाच्या पाण्यामुळे येथील हा कचरा काही प्रमाणात कुजून दुर्गंधी पसरली आहे. त्य़ामुळे या भागातून मार्गस्थ होणाऱया नागरिकांना आपाल्या तोंडावर व नाकावर हात ठेऊनच संचार करावा लागत आहे. त्यातच प्रवाश्यांच्या सुविधेकडे तितक्याच पध्दतीने पाहणे हे देखिल कर्मचाऱयांचे काम असते, पण येथे साठणाऱया का कचऱयाकडे मात्र एसटी आगारातील सर्वच कर्मचाऱयांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

कराडला दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन

Patil_p

वाटल्यास, तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करू; प्रविण दरेकरांनी साधला राऊतांवर निशाणा

Archana Banage

एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

Archana Banage

कोयना धरणाचा पाणीसाठा 8 फुटांनी वाढला

Amit Kulkarni

पशुधन वाचविणे ही काळाची गरज आहे नामदार बाळासाहेब पाटील

Patil_p

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!