Tarun Bharat

चढउताराच्या प्रवासानंतर बाजार बंद

Advertisements

सेन्सेक्स 12 अंकांनी तेजीत तर निफ्टी 10 अंकांनी घसरणीत 

वृत्तसंस्था / मुंबई

चालू आठवडय़ात भारतीय शेअर बाजाराला सलगची तेजीची मजल मारता आली नाही. यामध्ये काही सत्रे तेजीत तर काही घसरणीत राहिली होती.  गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळामुळे शेअर बाजारात चढउताराचा कल राहिला होता. आठवडय़ातील अंतिम दिवशी मात्र शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 12.78 अंकांनी किंचीत वधारुन बंद झाला.

शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात चढउताराच्या वातावरणानंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 12.78 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 51,544.30 वर बंद झाला. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,163.30 वर बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक 2.66 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. सोबत बँकिंग क्षेत्रातील निर्देशांकांने 400 अंकांची वाढ नोंदवली आहे. दुसऱया बाजूला एफएमसीजी, धातू आणि औषध क्षेत्रातील समभाग मात्र घसरणीत राहिल्याची नोंद केली आहे.

चालू आठवडय़ातील शेअर बाजारातील स्मॉलकॅपचे समभाग तेजीत राहिले आणि निफ्टीचा स्मॉल कॅप निर्देशांक 3.9 टक्क्यांनी वधारला होता. आयटी क्षेत्राचा निर्देशांक 3 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला सरकारी बँकींगच्या समभागांनी गुंतवणूकदारांना निराश केले आहे.

बीएसईमधील 3,134 समभागांमध्ये ट्रेडिंग झाले आहे. यामध्ये 1,435 समभाग वाढीसोबत तर 1,532 समभाग हे घसरणीत राहिले आहेत. यामधील 350 समभागांना अपर सर्किट लागले आहे. लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 203.83 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे.

आगामी आठवडय़ात शेअर बाजार सकारात्मक कामगिरी करणार आहे, की नाही याचा अंदाज लावण्यासोबत अन्य घडामोडींचा प्रभाव भारतीय बाजारावर राहणार काय ?आदी प्रश्नांचा मागोवा घेत गुंतवणूकदारांना आपला निर्णय घ्यावा लागणार असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

तिमाही अहवालाचा प्रभाव

डिसेंबर तिमाहीमधील विविध कंपन्यांचे नफा कमाईचे अहवाल सादर करण्यात येत आहेत. याचा अंदाज घेत गुंतवणूकदार आपली गुंतवणूक शेअर बाजारात करत आहेत. यामुळे येत्या आठवडय़ात योग्य तिमाही अहवाल असणाऱया कंपन्यांना पसंती मिळण्याचे संकेत व्यक्त होत आहेत.

Related Stories

एलआयसी सेवा – कोणत्याही शाखेत क्लेम जमा करता येणार

Patil_p

8 टक्के करतात ऑनलाइन खरेदी

Patil_p

झोमॅटो, नायका, पेटीएम बनले लार्जकॅप समभाग

Patil_p

देशांतर्गत बाजारासाठी 16 मार्च ठरला ‘ब्लॅक मंडे’

tarunbharat

कार्यालयीन गाळय़ांच्या मागणीत 73 टक्के घट

Patil_p

शेअर बाजारात तेजीची दिवाळी

Patil_p
error: Content is protected !!